Smart Contract Sakal
अर्थविश्व

फिनटेक : स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट

बिटकॉइन हे आभासी चलन विलक्षण लोकप्रिय आहेच; पण त्यापाठोपाठ इथेरियम नावाचे आभासी चलनही खूप लोकप्रिय झाले आहे.

अतुल कहाते akahate@gmail,com

बिटकॉइन हे आभासी चलन विलक्षण लोकप्रिय आहेच; पण त्यापाठोपाठ इथेरियम नावाचे आभासी चलनही खूप लोकप्रिय झाले आहे. इथेरियम या आभासी चलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त चलन नसून, त्यात संगणकीय यंत्रणांचे कामकाज चालण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणूनच तांत्रिक भाषेत इथेरियमचा उल्लेख ‘प्लॅटफॉर्म’ असा केला जातो; कारण याचा वापर करून आपण उपयुक्त ठरेल, असे सॉफ्टवेअर लिहू शकतो. याच इथेरियमचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ आहे. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाच्या जोडीला ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर केला जाईल, असे मानले जाते.

‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ची संकल्पना तशी अगदी सोपी आहे. समजा, आपण आपल्या विमान प्रवासासाठीचे तिकीट काढलेले असेल; पण ऐनवेळेला विमान कंपनीने काही कारणामुळे हे तिकीट रद्द केले किंवा विमानाचे उड्डाण रद्द केले, तर अशा प्रसंगी आपले नुकसान कमीत कमी व्हावे म्हणून अलीकडे अशा तिकिटांचा विमा काढण्याची संकल्पना मूळ धरायला लागली आहे; पण ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर केला तर अशा विमा योजनेची अजिबातच गरज भासणार नाही. याचे कारण म्हणजे आपल्याला तिकीट विकत असताना समजा संबंधित विमान कंपनीने ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’चा वापर केलेला असेल तर त्यात आपोआपच विमान किंवा तिकीट रद्द झाल्यास काय केले जाईल, यासाठीचे नियम लिहिलेले असतात. विमान किंवा तिकीट रद्द होताच आपोआपच या नियमांची अंमलबजावणी केली जाते.

याचे एक उदाहरण म्हणजे समजा विमानाचे उड्डाण किंवा तिकीट रद्द झाले तर आपल्या खात्यात दुसऱ्या क्षणी विमान कंपनीच्या खात्यातून पैसे जमा तर होतीलच; पण आपल्याला अडचणीत आणल्याबद्दल विमान कंपनी आपल्याला थोडी नुकसानभरपाईसुद्धा देईल, अशी तरतूद या ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’मध्ये केली जाऊ शकते. त्यानुसार विमान कंपनीने विमानाचे उड्डाण किंवा तिकीट रद्द झाल्याची नोंद आपल्या संगणकामध्ये करताच, आपल्या खात्यात ही नुकसानभरपाई येईल. त्यासाठी कोठे खेटे मारा, फोन करा, इ-मेल लिहा, वेळप्रसंगी तक्रार नोंदवा, यातील काहीच करावे लागणार नाही. याचे कारण म्हणजे ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ म्हणजे एक संगणकीय प्रोग्रॅमच असतो. त्यात इतर सर्व प्रोग्रॅमप्रमाणेच ‘जर असे झाले तर असे करा...’ अशा प्रकारच्या तरतुदी करता येऊ शकतात. साहजिकच, विमानाचे उड्डाण किंवा तिकीट रद्द झाले तर काय करायचे, हे तिथेच लिहिले जाते आणि त्यानुसार आपोआप आपल्याला नुकसानभरपाई मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT