Crude Oil Rate e sakal
अर्थविश्व

कच्च्या तेलाच्या किंमती ३०० डॉलरवर जाणार? पेट्रोल-डिझेलचा उडणार भडका

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन-रशिया युद्धामुळे (Ukraine Russia War) कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Rate) सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १३० डॉलरवर पोहोचल्या होत्या. त्यानंतर काही काळासाठी किंमती १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. २००८ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती इतक्या वाढल्या आहे. या किंमती ३०० डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी बेलारूसमध्ये सोमवारी तिसरी फेरी झाली. पण ते देखील निष्फळ ठरली. रशियन तेलावर बंदी घालण्याच्या निर्णयाचे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम होतील. आम्ही तेलाच्या किंमती किती वाढवू याचा अंदाज देखील तुम्ही लावू शकत नाही. तेलाच्या किंमती ३०० डॉलरच्या वर जातील, असं रशियाचे नेते अलेक्झांडर नोव्हाक यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना सांगितलं होतं.

जर पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर निर्बंध लादले तर कच्च्या तेलाची किंमती 300 डॉलरपर्यंत पोहोचेल. तसेच रशिया आणि जर्मनी दरम्यान चालणारी गॅस पाइपलाइन देखील बंद होईल. शेवटी, तेल आणि इतर वस्तूंच्या वाढत्या किंमतींचा परिणाम जगावर होऊन महागाई वाढेल, असं रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होते. अद्याप भारतात इंधनाचे दर वाढले नाहीत. पण, होळीपर्यंत हे दर वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतात आधीच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. आता आणखी दर वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला जोरदार फटका बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT