rahul singh  sakal
अर्थविश्व

यापूर्वीच्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा; राहूल सिंह

जीडीपीचा विकासदर सात टक्के राहण्यासाठी गुंतवणुक वाढण्यावर भर दिला पाहिजे.

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील अर्थसंकल्पात विकास साधण्यासाठी खासगीकरण, गुंतवणुक या क्षेत्रांना सुखद धक्का मिळाला होता. त्या अर्थसंकल्पातील खासगीकरण, बॅडबँक आदी तरतूदींची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी आताच्या अर्थसंकल्पात भर दिला पाहिजे, असे टाटा म्युचुअल फंडाचे राहूल सिंह यांनी सांगितले.

जीडीपीचा विकासदर सात टक्के राहण्यासाठी गुंतवणुक वाढण्यावर भर दिला पाहिजे. खासगी क्षेत्रात गुंतवणुक होत असल्याचे सुचिन्ह दिसते आहे. मात्र एमएसएमई क्षेत्रावरील दडपण पाहता तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची कमी झालेली मागणी पाहता सामाजिक उद्दीष्ठांकरिता निधी खर्च करणे व जादा अनुदाने या अर्थसंकल्पातही कायम राहतील असे दिसते. प्रत्यक्ष कररचनेतील बदल किमान असतील व ते कमी उत्पन्न गटासाठीच होतील, अशीही अपेक्षा त्यांनी वर्तविली.

अर्थव्यवस्था सुधारत असल्याने सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सरकारला रोजगार हमीसारख्या सामाजिक योजनांवर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. खासगीकरणावर भर देणे हे चांगले पाऊल आहे, त्यामुळे लोकोपयोगी कामांसाठी तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल. मात्र या दिशेकडील वाटचाल मंदच असल्याने यापुढे सरकारी बँकांच्या खासगीकरणासह सरकारची पुढील पावले काय राहतील याकडे सर्वांचे लक्ष राहील, असेही सिंह यांनी सांगितले.

मालमत्तेची विक्री, वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण यावरही लक्ष ठेवले जाईल. उत्पादनक्षेत्रात जास्त गुंतवणुक व्हावी यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूदी असतील अशी अपेक्षा आहे. त्याखेरीज अपारंपारिक उर्जास्रोतांपासून वीजनिर्मितीला व त्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. आरोग्यक्षेत्राकडील दुर्लक्ष महाग पडल्याचे कोविडकाळात दिसून आले, या क्षेत्रावरील सरकारचा खर्च वाढताच राहील तर यात खासगी क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळेल. घरबांधणी क्षेत्राची निधी उभारणी व कररचना याबाबत सरकारकडून साह्य मिळेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वीच सरकारने जाहीर केलेल्या बाबींच्या अंमलबजावणीकडे लक्ष देऊन या घडीला सर्व क्षेत्रांना साह्य करावे, अशीच अपेक्षा असल्याचे सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meena river flood impact: मीना नदीत जलपर्णी व कचऱ्यामुळे प्रवाह अडला; पुराचे पाणी शेतात घुसून सुपीक माती वाहून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Pune Metro Delay: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुलकावणी; पीएमआरडीएच्या चौथ्या घोषणेलाही फोल

Smart Meter Policy: ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचा शब्द

Apple Orchard Protection : समुद्रातील जुन्या जाळ्या अन् बांबूची कमाल! सफरचंदाच्या बागेसाठी शेतकऱ्याचा अजब जुगाड; फक्त 35 हजारांत माकडं अन् पक्ष्यांपासून मिळवलं 'सुरक्षा कवच'

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

SCROLL FOR NEXT