Stock to Buy Esakal
अर्थविश्व

Stock to Buy: ऑटो आणि फार्मा क्षेत्रातले मजबूत शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी शेअर बाजारात खरेदीसाठी दोन मजबूत स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स खरेदी करून, गुंतवणूकदार कमी ते दीर्घ मुदतीत चांगले पैसे कमवू शकतात.

शिल्पा गुजर

कोरोनाच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. गेल्या 2 वर्षात लाखो डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. याचे कारण म्हणजे लोकांना आता शेअर बाजार समजू लागला आहे. तुम्ही देखील शेअर बाजारात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजार तज्ज्ञांनी तुमच्यासाठी दोन मजबूत स्टॉक आणले आहेत. हे दोन स्टॉक खरेदी करून तुम्ही कमी काळात चांगले पैसे कमवू शकता.

विकास सेठी यांनी सुब्रोस (Subros) आणि टार्सन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सुब्रोस (Subros)

सुब्रोस ही कंपनी देशातील सर्वात मोठी कार एसी बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे 42 टक्के आहे. आगामी काळात वाहन क्षेत्र आणि वाहन घटक क्षेत्रात जोरदार तेजी येऊ शकते असे तज्ज्ञांनी सांगितले, यात प्रोमोटर्सचा हिस्सा 37 टक्के आहे.

सुब्रोस (Subros)

सीएमपी (CMP) - 380 रुपये

टारगेट (Target) - 395 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 365 रुपये

टार्सन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products)

ही कंपनी फार्मा, डायग्नोस्टिक आणि हॉस्पिटल सारख्या क्षेत्रांसाठी काम करते. नुकताच कंपनीचा आयपीओ (IPO) आला होता आणि यामध्ये 77 टक्क्यांपर्यंत सबस्क्रिप्शन झाले. पण पेटीएम आयपीओचा या कंपनीवरही परिणाम झाला.

टार्सन्स प्रोडक्ट्स (Tarsons Products)

सीएमपी (CMP) - 654.60 रुपये

टारगेट (Target) - 675 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 630 रुपये

कंपनीचे देशात 141 वितरक (Distributors) आहेत. या स्टॉकमधून मध्यम ते दीर्घ मुदतीत चांगली कमाई केली जाऊ शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT