Bank Share Sakal
अर्थविश्व

‘अर्थ’बोध : बँकेत एफडी, की बँकेचे शेअर?

बँकेमधील मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर झपाट्याने खाली येत आहेत. शिवाय बचत खात्यावरील व्याजदराला देखील गळती लागली आहे.

गोपाळ गलगली

बँकेमधील मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर झपाट्याने खाली येत आहेत. शिवाय बचत खात्यावरील व्याजदराला देखील गळती लागली आहे. ही परिस्थिती सुधारण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. पण त्याच वेळेला महागाईने मात्र वरचा सूर धरला आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला उत्पन्न व खर्चाचा मेळ घालता घालता नाकीनऊ येत आहे.

ही परिस्थिती अशीच चालू राहणार असेल, तर त्यावर काही तरी उपाय शोधावा लागणार आहे. यातूनच एक विचार पुढे आला. तो मी मांडतो.

एफडी आणि बँकेचे शेअर

ज्या बँकेमध्ये आपण विश्वासाने ठेव ठेवतो, त्याच बँकेचे शेअर उत्तम परतावा देत असतील, तर त्यांचा पण आपण गुंतवणुकीसाठी विचार करू शकतो. मुदत ठेवीवरील निश्चित दराने परतावा मिळत असला तरी त्याचे व्याज करपात्र असते; परंतु शेअरच्या परताव्यावर काही प्रमाणात करापासून सूट मिळू शकते. शिवाय शेअरवरील लाभांश देखील एकूण शेअरवरील परतावा वाढवू शकतो.

काही उदाहरणे

बँका किंवा शेअर अंदाजे परतावा

सर्व सरकारी आणि खासगी बँका आणि

ज्येष्ठ नागरिक ठेवी ५ ते ८ टक्के

सरकारी बँकांचे शेअर २४ ते ५२ टक्के + लाभांश

खासगी बँकांचे शेअर ३९ ते ८० टक्के + लाभांश

यावरून असे लक्षात येईल, की बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा बँकेचे शेअर जास्त परतावा देतात. अर्थात शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम जास्त असते, हेही लक्षात घेतले पाहिजे.सर्वसामान्य माणसाला बँकेतील ठेवीची मूळ किंमत कमी होणार नाही, याची खात्री असते. मात्र, बँकेच्या शेअरभावामधे चढ-उतार होत असतात. ही भीती शेअरवर दीर्घकाळात मिळणारा वाढीव परतावा दूर करते. मात्र, ठेवींवरील विम्याचे संरक्षण शेअरमधे नसते. पण ही भीती अनाठायी आहे. कारण जिथे अधिक जोखीम, तिथे परतावाही अधिक, हे समीकरण असतेच.

बँक तीच... पण फक्त नजर आणि विचार बदलला, तर परतावाही वाढू शकतो. बघा पटतंय का?

(लेखक शेअर बाजारातील गुंतवणुकीचे जाणकार अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT