Aadhaar pan linking  
अर्थविश्व

Aadhaar Pan Link : आधार-पॅनकार्ड लिंक करण्याची पुन्हा मुदतवाढ!

आधार-पॅन लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली, जाणून घ्या डिटेल्स

नामदेव कुंभार

Pan-Aadhar Linking: ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोण्याची मुदत होती. सरकारने आता आधार-पॅन जोडण्याची मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोण्याची मुदत सहा महिन्याने वाढवली आहे. आता 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकता.

आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात बातम्याही दिल्या जात होत्या. मात्र तरीदेखील अनेकांनी लिंक केले नाही. वारंवार सूचना करुनही आधार-पॅन लिंक केलं जात नाही. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत 12-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 च्या वित्त विधेयाकामध्ये कर प्रस्तावात दुरुस्त्याद्वारे सुधारणा करून आधार अनिवार्य केले आणि यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

किती होऊ शकतो दंड?

बँक खाते उघडण्यासाठी, म्युचअल फंड ट्रन्जेक्शन,स्टॉक मार्केट गुंतवणूक, बँक व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास 50 हजारांपेक्षा जास्तच्या व्यवहारांवर 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दर आधार-पॅन लिंक नसेल तर बँकमार्फत टीडीएस कट होत शकतो. आयकर विभाग कलम 139AAनुसार, आधारशी पॅन न लिंक केल्यास पॅन कार्ड बंद होऊ शकते. तसेच आयटीआरही फाइल होणार नाही.

कसं कराल लिंक -

incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर आधार-पॅन लिंक असा पर्यंय मिळेल. त्यानंतर आपला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डाची माहिती द्यावी लागेल. यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयकडून या माहितीची पडताळणी केली जाईल. आधार कार्डावरील नाव आणि नागरिकाने वेबसाईटवर दिलेले नाव यात मोठी तफावत आढळल्यास वन टाईम पासवर्डची(ओटीपी) गरज भासेल. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे हा क्रमांक कळविला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : काँग्रेस खासदार राहुल गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघाले

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT