HDFC Bank  Sakal
अर्थविश्व

HDFC चा ग्राहकांना झटका; एका निर्णयामुळे सर्वच कर्जांचे हप्ते वाढणार

नवीन कर्जदर 7 जून 2022 पासून लागू करण्यात येणार असल्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : HDFC बँकेने आठवडाभरात ग्राहकांना दुसऱ्यांदा मोठा झटका दिला आहे. बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्समध्ये (MCLR) 35 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे, अशी माहिती बँकेने त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे. आज 7 जून 2022 पासून नवीन कर्जदर लागू करण्यात येणार असल्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांच्या हफ्त्यात वाढ होणार असून, यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्जांचे हप्ते महागणार आहे. एचडीएफसी बँकेने एका आठवड्यात दुसऱ्यांदा कर्ज महाग केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जून रोजी बँकेने RPLR (रिटेल प्राइम लेंडिंग रेट) मध्ये पाच आधार अंकांची वाढ केली होती. (HDFC Bank Loan News)

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, MCLR मध्ये 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आल्यानंतर हा दर 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय एका महिन्यासाठीचा रेट 7.55 टक्के आणि तीन महिन्यांसाठी 7.60 टक्के करण्यात आला आहे. तर, सहा महिन्यांच्या मुदतीच्या कर्जावरील MCLR दर आता 7.70 टक्के करण्यात आला असून, एका वर्षासाठी 7.85 टक्के इतका दर करण्यात आला आहे. या वाढीनंतर, दोन आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR दर अनुक्रमे 7.95 टक्के आणि 8.05 टक्के झाला आहे.

HDFC पाठोपाठ कॅनरा बँकेचेही कर्ज महागले

दरम्यान, एचडीएफसी बँकेपाठोपाठ कॅनरा बँकेनेही MCLR 0.05 टक्क्यांची वाढ करण्याचे घोषित केले असून, कॅनेरा बँकेने 7.4 टक्के इतका कर्जदर केला आहे. कॅनरा बँकेचे नवे कर्जदर देखील आजपासून लागू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT