अर्थविश्व

मल्टीप्लेक्स PVR आणि INOXच्या शेअर्सवर राजामौलींच्या RRRची जादू!

शिल्पा गुजर

मल्टिप्लेक्स कंपन्यांच्या शेअर्सने कमबॅक केले आहे. शुक्रवारी पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या किमती 25 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी या शेअर्समध्ये तेजी दिसली त्याचे एक कारण म्हणजे आरआरआर हा बिग बजेट सिनेमा असल्याचे बोलले जातंय. ज्येष्ठ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला.

शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत वाढले
शुक्रवारी दुपारी, PVR च्या शेअरची किंमत 4 टक्क्यांहून वाढत 1853.15 रुपयांवर व्यवहार करत होती. तर INOX च्या शेअरची किंमत 7 टक्क्यांहून अधिक वाढून 476.95 रुपयांवर होती. गेल्या सहा सत्रांपैकी पाच सत्रांमध्ये आयनॉक्सचा शेअर वधारला आहे. या कालावधीत सुमारे 17 टक्के वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 34 टक्क्यांनी वाढला आहे.

बिग बजेट सिनेमांचा प्रभाव


7 मार्चपासून PVR चा स्टॉक जवळपास 22 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत तो 41 टक्क्यांनी वाढला आहे. अलीकडे अनेक मोठे सिनेमे आलेत, त्यात झुंड, काश्मीर फाइल्स, बच्चन पांडे आणि आता आर.आर.आर. आलेत त्यामुळेही गुंतवणूकदार या शेअर्समध्ये खरेदी करु लागलेत.

निर्बंध काढून टाकण्याचे फायदे


मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. ज्या उद्योगावर याचा सर्वाधिक परिणाम झाला. त्यात मल्टिप्लेक्स उद्योगाचाही समावेश होता. पण, आता निर्बंध उठवल्यामुळे लोक पुन्हा चित्रपट बघायला लागले आहेत.

मल्टीप्लेक्स शेअर्स आणखी वधारतील

RRR बनवण्यासाठी किमान 300 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. ही फिल्म तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज केली आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्स शेअर्स आणखी वधारतील अशी शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: मुलाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्या, शिवसेनेच्या नेत्याची सुनेत्रा पवारांना विनंती

IPL 2026: २८१ स्ट्राईक रेट अन् ९३ धावा... रजत पाटिदार प्लेऑफचा 'दादा'; Final मध्ये पोहचताच म्हणाला, 'आम्ही तुमच्यावर चालून येतोय...'

Sant Nivruttinath Rath: संत निवृत्तिनाथांच्या रथास यंदा सुरेगावची बैलजोडी; इतिहासात प्रथमच सिन्नर तालुक्याला मान

Yavatmal: शिंदेसेनेच्या नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला

NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT