Intel Capital to Invest Rs 1894.50 Crores in Jio Platforms 
अर्थविश्व

जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?

वृत्तसंस्था

मुंबई : जिओ फ्लॅटफॉर्मवर अनेकजण सध्या गुंतवणूक करत आहेत. आता इंटेल कॅपिटल ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये सातत्याने गुंतवणूक होत असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज (ता. ०३) देण्यात आली. गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणारी इंटेल कॅपिटल ही ११ वी कंपनी ठरणार आहे. तर, जिओमध्ये होणारी ही १२ वी गुंतवणूक असणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इंटेल कॅपिटल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये तब्बल १८९४.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १८९४.५० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे इंटेल कंपनीला जिओमध्ये ०.३९ टक्क्यांची हिस्सेदारी मिळेल. जगभरात दर्जेदार कॉम्प्युटर चिप बनवण्यासाठी इंटेल कंपनीची ओळखली जाते. या गुंतवणूकीसोबतच गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून झालेल्या गुंतवणूकीचा आकडा ११७५८८.४५ कोटी रुपये होईल.

चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित

दरम्यान, जिओमध्ये सर्वात आधी फेसबुकने ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं ५६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत ११३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. या पद्धतीने एकूण आतापर्यंत ११ कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. आता इंटेल कॅपिटल जिओमध्ये १८९४.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जिओसाठी ही मोठी बातमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 8 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणार; महागाई भत्ता अन् HRA वर काय होणार परिणाम?

Mumbai High Court : आश्रमशाळेत 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू अन् राज्यभर संताप! उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 24 तास डॉक्टर हजर ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश

Nepal Flood : नेपाळमध्ये जलप्रलय! मृतांची संख्या ६६९ वर; अद्याप २५०० हून अधिक जण बेपत्ता, मदतीला वेग

Tribal Students Protest : CM फडणवीसांची मध्यस्थी अन् रात्री निर्णय; पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण स्थगित, मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Nepal Flood : ‘तो’ आयुष्यातील शेवटचा धावण्याचा क्षण...

SCROLL FOR NEXT