Investment  sakal
अर्थविश्व

गुंतवणूकसंधी : सुरक्षित गुंतवणुकीचे नवे पर्याय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात

सुधाकर कुलकर्णी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे काही नवे पर्याय दिले आहेत.

महिला सन्मान सेव्हिंग्ज सर्टीफिकेट : या योजनेत महिला, मुली गुंतवणूक करू शकतील. कमाल दोन लाख रुपये इतकी गुंतवणूक करता येईल. किमान गुंतवणुकीबाबत अजून स्पष्टता नाही. गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्षे इतका असेल, मात्र गरज पडल्यास मुदतीआधी रक्कम काढता येईल. मिळणारे व्याज प्रतिवर्षी ७.५ टक्के दराने असेल व मुदतीनंतर एकरकमी दोन लाख ३१ हजार १२५ रुपये मिळतील.

ही गुंतवणूक एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत एकदाच करता येईल. गुंतवणुकीवर अथवा मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर सवलत नाही. ही गुंतवणूक ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पोस्ट व राष्ट्रीयीकृत बँकेत करता येईल. या योजनेची प्रत्यक्ष सुरुवात झाल्यावर आणखी स्पष्टता येऊ शकेल.

सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम :

या योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा आता आधीच्या १५ लाख रुपयांवरून ३० लाख रुपये केली आहे. यामुळे पती व पत्नी दोघांनाही ६० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. सध्या यावरील वार्षिक व्याजाचा दर आठ टक्के इतका आहे. ही वाढीव मर्यादा ज्येष्ठांसाठी निश्चितच फायदेशीर असेल. या योजनेच्या अन्य अटी, शर्तीत काहीही बदल झालेला नाही.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम:

या योजनेची आधीची ४.५ लाख रुपयांची गुंतवणुकीची कमाल मर्यादा आता नऊ लाख रुपये इतकी केली आहे. मात्र संयुक्त नावावर १५ लाख रुपयेच गुंतविता येतील. (प्रत्येकी ९ लाख याप्रमाणे दोघांचे मिळून १८ लाख गुंतविता येणार नाहीत.) योजनेच्या अन्य अटी, शर्तीत काहीही बदल झालेला नाही. सध्या यावर मिळणारा वार्षिक व्याजदर ७.१ टक्के आहे.

थोडक्यात, आधीच्या दोन योजनांतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा आता दुप्पट झाली आहे, तर महिलांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर - ‘सीएफपी’ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT