Mukesh Ambani News esakal
अर्थविश्व

Valuable Firm : अंबानींच्या 10 पैकी 7 कंपन्यांनी कमावला 'एवढा' नफा; आकडेवारी जाहीर

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशांतर्गत सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

सकाळ डिजिटल टीम

दर आठवड्याला भारतातील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घट आणि वाढीची आकडेवारी जाहीर केली जाते. कंपन्यांच्या मार्केट कॅपमधील घसरण देशांतर्गत शेअर बाजारावर अवलंबून असते. या आठवड्यात 10 पैकी 7 कंपन्यांनी 1 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या आठवड्यात 7 कंपन्यांनी बाजार मूल्यांकनात 1,33,707.42 कोटी रुपयांची भर घातली आहे.

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज इक्विटी शेअर मार्केटमध्ये अव्वल स्थानावर असून एका आठवड्यात सर्व कंपन्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. त्यापाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC आणि ITC यांचा क्रमांक लागतो. तर ICICI बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि भारती एअरटेल यांना मार्केट कॅपमध्ये तोटा झाला आहे.

हेही वाचा : भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल (MCAP) रु. 44,956.5 कोटींनी वाढून रु. 17,53,888.92 कोटी झाले आहे. तर HDFC बँकेने रु. 22,139.15 कोटी कमावले असून, तिचे मूल्यांकन रु. 8,34,517.67 कोटी झाले आहे. दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारमूल्य 20,526.61 कोटी रुपयांनी वाढून 5,29,898.82 कोटी रुपये झाले आहे आणि TCSचे बाजारमूल्य 19,521.04 कोटी रुपयांनी वाढून 11,76,860.69 कोटी रुपये झाले आहे.

HDFC चे मार्केट कॅप 16,156.04 कोटी रुपयांनी वाढून 4,52,396.31 कोटी रुपये आणि ITC चे मार्केट कॅप 9,861.07 कोटी रुपयांनी वाढून 4,38,538.73 कोटी रुपये झाले. त्याच वेळी, इन्फोसिसचे मूल्यांकन 547.01 कोटी रुपयांनी वाढून 6,37,023.14 कोटी रुपये झाले आहे.

याउलट, आयसीआयसीआय बँकेचे एम-कॅप 1,518.27 कोटी रुपयांनी घसरून 6,31,314.49 कोटी रुपये आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे 1,186.55 कोटी रुपयांनी 5,92,132.24 कोटी रुपये झाले. याशिवाय दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचा एमकॅप 222.53 कोटींनी घसरून 4,54,182.23 कोटींवर आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशांतर्गत सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, एचडीएफसी आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT