Paytm News sakal
अर्थविश्व

Paytm News : अलीबाबाने Paytm केला टाटा बाय-बाय! कंपनीला 'एवढ्या' कोटींचे नुकसान, शेअर्समध्ये...

देशातील आघाडीची फिनटेक कंपनी पेटीएमच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

Alibaba Paytm Deal News : देशातील आघाडीची फिनटेक कंपनी पेटीएमच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधीच कठीण काळातून जात असलेल्या पेटीएममधून मोठे गुंतवणूकदार बाहेर पडताना पाहिले आहेत.

चिनी कंपनी अलीबाबाने पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्समधील उर्वरित 3.16 टक्के हिस्सा सुमारे 1,360 कोटी रुपयांना विकला आहे.

अलिबाबाने कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. डिसेंबर 2022 पर्यंत, पेटीएममध्ये अलीबाबाची 6.26 टक्के हिस्सेदारी होती.

जानेवारीमध्ये कंपनीने 3.1 टक्के हिस्सा विकला होता. उर्वरित 3.16 टक्के शेअर्स विक्रीचा करार शुक्रवारी झाला.

अलीबाबाने पेटीएममधील आपला संपूर्ण थेट हिस्सा घाऊक व्यवहारात विकला आहे. अलीबाबा व्यतिरिक्त, त्यांची समूह कंपनी अँट फायनान्शिअल पेटीएममध्ये सुमारे 25 टक्के हिस्सेदारी आहे.

पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण असूनही, पेटीएमचा शेअर गेल्या 5 दिवसांत जवळपास 20 टक्क्यांनी वाढला आहे. या तेजीमागे पेटीएमच्या तिमाही अहवालातील सुधारणा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा कमी झाला आहे.

ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत, पेटीएमचा महसूल वार्षिक आधारावर 41 टक्क्यांनी वाढून 2062 कोटी रुपयांवर पोहोचला.

तर निव्वळ तोटा वार्षिक आधारावर 778 कोटी रुपयांवरून केवळ 392 कोटी रुपयांवर घसरला. पेटीएमने सप्टेंबर 2023 च्या तिमाहीपर्यंत नफा वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा : वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची

विशेष म्हणजे, शेअर बाजारात पेटीएमची लिस्टिंग 2021 मध्ये झाली होती. लिस्टिंग दिवसापासून पेटीएमने गुंतवणूकदारांना धक्का दिला आहे.

शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा अलिबाबाने या तेजीला ब्रेक लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT