Check Today's Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

IOCL ने जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर!

भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

आईओसीएल (IOCL) ने रविवारी (ता. 06) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यानी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. जवळपास तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी किमती बदलल्या होत्या. त्यानंतर सरकारने दर कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) शनिवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात (Pune) पेट्रोलचे दर 109.72 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.50 रुपये प्रति लीटरवर आहे. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील इतर शहरामधील इंधनाचा दर काय आहे.

भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे. निवडणुका संपताच पेट्रोल प्रति लिटर १२० रुपयावर जाण्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT