अर्थविश्व

व्याज दर जैसे थे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय

सूरज यादव

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली असून रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली. एप्रिलमध्येही पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. तेव्हा रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के असाच ठेवला होता. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पतधोरण समितीच्या बैठकीत सर्वाधिक सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याच्या बाजूने मत दिले. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम कमी करण्यासाठी तसंच वाढ स्थिर ठेवण्यासाठी असा निर्णय घेतला असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.

शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, आर्थिक सुधारणांसाठी दरांमध्ये कोणता बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेनं एप्रिल महिन्यात झालेल्या पतधोरण बैठकीतही प्रमुख व्याज दरांमध्ये बदल केला नव्हता. अर्थव्यवस्थेसाठी काही गोष्टी आशेचा किरण असल्याचे सांगितले. तसंच मान्सूनचा अंदाज, कृषी क्षेत्राची क्षमता आणि जागतिक पातळीवर पुन्हा पुर्ववत होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्यानं देशांतर्गत अर्थव्यवस्थेत तेजी येऊ शकते असा अंदाजही शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला.

जीडीपी वाढीच्या अंदाजाबद्दल गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी 9.5 टक्के इतका अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनं चालु आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्के इतका कमी केला आहे. 2021-22 साठी CPI इन्फ्लेशनचा अंदाज 5.1 टक्के इतका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT