service sector growth in August survey revealed that jobs increased delhi sakal
अर्थविश्व

सेवाक्षेत्राची ऑगस्टमध्ये जोरदार घोडदौड ; नोकऱ्या वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर

एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑगस्टमध्ये ५७.२ इतका वाढला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सण-उत्सवाच्या काळाच्या आधी देशाच्या सेवा क्षेत्राने उत्तम वाढ साधल्याचे सांगितले जात आहे. एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑगस्टमध्ये ५७.२ इतका वाढला. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त होती. सेवा क्षेत्रातील घडामोडी बघता ही वाढ ५५ पर्यंत राहील असे विविध रेटिंग एजेन्सींकडून सांगण्यात आले होते. जुलैमध्ये हा आकडा ५५.५ इतका होता. विशेष बाब म्हणजे पीएमआय ५० पेक्षा जास्त असल्याचा हा तेरावा महिना आहे.

नवे व्यवसाय सुरू झाल्यामुळे ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्राची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या क्षेत्रात नव्याने नोकरीचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये नोकरीच्या वाढीचे प्रमाण हे गेल्या चौदा वर्षात सर्वात जास्त असल्याचे एस अँड पीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये ५० टक्के योगदान हे सेवा क्षेत्राचे आहे, त्यामुळेही या क्षेत्रातील वाढ महत्वाची समजली जाते. कोरोनाच्या प्रसारामुळे या क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला होता. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचे सहायक संचालक पोलिन्ना डी. लामा यांनी सांगितले की कोविडचा प्रसार कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या मध्यात सेवा क्षेत्रात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या तेजीच्या जोरावर सेवा क्षेत्राने जुलैमध्ये पुनरागमन केले.

गती मंदावण्याची अर्थतज्ज्ञांकडून भीती

ऑगस्ट ते जून दरम्यान अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती वाढली. पण, काही अर्ततज्ज्ञांचे मत आहे की येणाऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता आहे. वाढते कर्ज, महागाई आणि जागतिक मंदी यांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Pune: पावसामुळे बाजारात फळभाज्यांची आवक घटली; फळांच्या भावांत चढ-उतार; घेवडा, कोथिंबीर स्वस्त, तर शेपू, कांदापात महागले

Navtapa 2026 Begins : आजपासून नवतपाचा तडाखा! विदर्भ होरपळणार, काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT