Share Market google
अर्थविश्व

Share Market : 1 लाखाचे 4 कोटी, या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना दिला तगडा रिटर्न

1:5 च्या गुणोत्तरामध्ये स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर, कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची होल्डिंग 60,605 (12,121 x 5) झाली असती.

नमिता धुरी

मुंबई : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. लोकांची गुंतवणूक चार ते पाच पटीने वाढवली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे.

या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपये गुंतवणारेही आज कोट्यधीश झालेत. आम्ही एचईएल ग्लासकोट (HEL Glasscoat) शेअरबाबत बोलत आहोत. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सध्या बाजारात शेअरची किंमत 662 रुपये आहे.  हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये (HEL Glasscoat) 1 लाख रुपये गुंतवले असते तर तो आज कोट्यधीश झाला असता. या शेअरमुळे गुंतवणूकदारांच्या पैशात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

दहा वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ 8.25 रुपये होती. तेव्हा कुणी यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 12,121 शेअर्स मिळाले असते. 1:5 च्या गुणोत्तरामध्ये स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर, कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची होल्डिंग 60,605 (12,121 x 5) झाली असती.

स्विस ग्लासकोटच्या शेअरची किंमत आता सुमारे 666 आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्यांच्या 1 लाखाचे आता अंदाजे 4 कोटी (666 x 60,605) झाले असते. स्विस ग्लासकोटचे शेअर्स सध्या एनएसई आणि बीएसई दोन्हीवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. त्याची सध्याची मार्केट कॅप 4,552 कोटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT