stock sakal
अर्थविश्व

Short Term Stocks: मजबूत नफा हवा आहे, मग या 2 स्टॉक्सचा नक्की विचार करा

शिल्पा गुजर

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी 2 मजबूत स्टॉक्सची माहिती दिली आहे, ज्यात पैसे गुंतवून तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये चांगला परतावा मिळवू शकता. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आणि चांगले स्टॉक्स निवडणे खूप महत्वाचे आहे. योग्य आणि मजबूत परतावा देणारे शेअर्स निवडले नाहीत, तर शेअर बाजारात गुंतवलेले पैसेही बुडू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही बाजारातील तज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. शेअर बाजार तज्ज्ञ आणि सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील 2 मजबूत स्टॉक्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील एआयए इंजिनियरिंग लिमिटेड (AIA Engineering Ltd) आणि सुमितोमो केमिकलचे (Sumitomo Chemical) शेअर्स खरेदी करावे असे म्हटले आहे.

1) एआयए इंजिनियरिंग लिमिटेड (AIA Engineering)

विकास सेठी यांनी आज खरेदीसाठी इंजिनिअरिंग सेक्टरमधील दमदार शेअर्सची निवड केली आहे. एआयए इंजिनियरिंग लिमिटेड ही अहमदाबादमधील इंजिनीअरिंग कंपनी आहे. हे वीज, खाणकाम आणि सिमेंट क्षेत्रासाठी काम करते असे विकास सेठी यांनी सांगितले.

एआयए इंजिनियरिंग लिमिटेड (AIA Engineering)

सीएमपी (CMP) - 1902.60 रुपये

टारगेट (Target) - 1930/1940 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 1870 रुपये

- कंपनीचे फंडामेंटल्स

कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय चांगले आहेत. कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 25 टक्के आहे. विकास सेठी यांच्या मते, सध्या या शेअरमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. हा स्टॉक तुम्ही शॉर्ट टर्मसाठी खरेदी करू शकता.

2) सुमितोमो केमिकल (Sumitomo Chemical)

सुमितोमो केमिकल ही कृषी पिकांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी देशातील पीक काळजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत मजबूत निकाल सादर केले होते. कंपनीला सप्टेंबरमध्ये 153 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर जून तिमाहीत कंपनीला 105 कोटी रुपयांचा नफा झाला होता असे सेठी म्हणाले.

सुमितोमो केमिकल (Sumitomo Chemical)

सीएमपी (CMP) 368.55 रुपये

टारगेट (Target) - 385 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 355 रुपये

- कंपनीचे फंडामेंटल्स

या कंपनीचा इक्विटीवरील परतावा सुमारे 22 टक्के आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. हा स्टॉक येत्या काळात चांगला वाढेल आणि शॉर्ट टर्मसाठी यात गुंतवणूक करावी असे मत विकास सेठी यांनी मांडले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

SCROLL FOR NEXT