Stock Market Updates Sakal
अर्थविश्व

Stock Market: सगल तिसऱ्या दिवशी घसरला सेन्सेक्स; गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आठवड्याच्या चौथ्या दिवशीही शेअर मार्केट (Stock Market) कोसळलेलंच दिसून आलं. आज दिवसभराच्या चढउतारानंतर 634 अंशांनी सेन्सेक्स कोसळला आहे. आज सेन्सेक्स 59,464 च्या स्तरावर बंद झाला. यासोबतच निफ्टी देखील मार्केट ओपन झाल्या झाल्याच लाल निशाण्यावर होता. आज दिवसभराच्या व्यापारानंतर 181 अंशांनी घसरण होत निफ्टीही 17,757 च्या स्तरावर बंद झाला. आज दिवसभराच्या चढउतारामध्ये सेन्सेक्स 923 अंकांनी कोसळून 59,200 च्या स्तरापर्यंत गेला होता तर दुसरीकडे निफ्टी देखील 248 अंशांनी घसरुन 17,689 च्या स्तरावर पोहोचला होता. (Stock Market Latest Update News)

तीन दिवसांत 2000 अंशांनी कोसळला सेन्सेक्स

याआधीही गेले दोन दिवस मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याचं दिसून आलंय. काल व्यवहाराअंती सेन्सेक्समध्ये मोठी घट झालेली दिसून आली. तब्बल 656.04 अंशांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी सेन्सेक्स पडलेला दिसून आला. सेन्सेक्स या घसरणीसह 60,098.82 च्या स्तरावर बंद झाला होता. तर दुसरीकडे निफ्टी 174.65 अंशांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी बंद झाला होता.

गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर मार्केटमध्ये चढ दिसून आली होती. सेन्सेक्स 61,385 च्या स्तरावर पोहोचला होता. त्यावेळी बीएसईमध्ये नोंदणीकृत सगळ्या कंपन्यांची एकूण किंमत 2,80,02,438 कोटी रुपये होती. मात्र, त्यानंतर बाजारात घसरण होताना दिसून आली. त्यामुळे ही किंमत कमी होऊन बुधवारी 2,74,85,912 कोटी रुपयांवर आली. यामुळे गुंतवणुकदारांचं 5.15 लाख कोटी रुप यांचं मोठं नुकसान झालं आहे. आजच्या मोठ्या घसरणीमुळे हे नुकसान आणखीनच वाढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT