Heart of the Universe - True Love 
Blog | ब्लॉग

खऱ्या प्रेमाची अनुभूती..

राजेंद्र घोरपडे

प्रियाचां ठायी सन्मान । प्रिय न पाहे समर्था जाण । 
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो ।। 575 ।। अध्याय 11 वा 

ओवीचा अर्थ - असें पाहता की, स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले. त्याची आपण क्षमा करावी. 

असे म्हटले की, प्रेमात आणि युद्धात सर्व गोष्टी माफ असतात; पण प्रेमात सर्व गोष्टी माफ म्हणजे काय? प्रिय व्यक्तीने आपला मान राखला नाही, तरी त्याच्याकडून तशी अपेक्षा आपण कधीच करायची नसते. ती सन्मान करो न करो, आपण मात्र याबद्दल माफ करायचे असते. तरच ते प्रेम प्रेम राहते, तरच ते प्रेम टिकते आणि स्नेह वाढतो.

आपल्या प्रिय व्यक्तीने निमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याला भेटायचे नाही, त्याबद्दल मनात राग मनात धरायचा, नाराजी व्यक्त करायची, असे कदापि न करता त्याबद्दल त्याला माफ करून स्नेह कसा कायम राहील हेच पाहायचे असते. हेच खरे प्रेम असते. अध्यात्मात गुरू - शिष्य संबंध हा अशाच प्रेमावर आधारलेला आहे. पुत्राचे अपराध जसे वडील पोटात घेतात, तसे गुरू हे शिष्याचे अपराध आपल्या पोटात घेऊन स्नेह ठेवतात आणि शिष्याच्या प्रगतीवर ते लक्ष देतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT