Conference Call 
Blog | ब्लॉग

कॉन्फरन्स कॉल : ऑफलाइन स्मार्ट शिक्षणासाठी स्मार्ट पर्याय 

राजकिरण चव्हाण

शिक्षणात तंत्रज्ञान वापरताना अनेक वेळा स्मार्ट फोनची गरज असते. पण कित्येक पालकांकडे आजही स्मार्टफोन नाहीयेत. अशा पालकांच्या पाल्यांसाठी ऑफलाइन परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण कसं देता येईल, यासाठी "कॉन्फरन्स कॉल' हा एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो. 

एकमेकांशी बोलण्यासाठी आपण कॉल करतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी आपण पालकांशी, पाल्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. परंतु ही फक्त दोघांमधली संवादाची प्रक्रिया असते. परंतु यामध्ये कॉल चालू असताना "ऍड कॉल' हा ऑप्शन आपण सिलेक्‍ट केला तर आपल्या संभाषणामध्ये आणखी एकाला आपण ऍड करू शकतो. कॉल ऍड केल्यानंतर तेथील मर्ज कॉल हा ऑप्शन निवडावा, ज्यामुळं नवीन व्यक्तीही आपल्या संभाषणामध्ये ऍड होऊ शकेल. असं एकेक करत आपण नऊ ते दहा लोकांना एकाच वेळेस कॉलिंगला ऍड करू शकतो, ज्यामुळं एकाच वेळेस दहा लोक एकमेकांशी व्हॉईस कॉलिंग चालू असताना कॉन्फरन्स कॉल या ऑप्शनच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतात. या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांचं प्रकट वाचन, मूकवाचन, कविता - कथा सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा आदी ऍक्‍टिव्हिटीज घेता येतील, ज्यामुळं मुलांची शिक्षण प्रक्रिया निरंतर राहील. यातून "शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे' हा उपक्रम आपल्याला घेता येऊ शकेल. कारण, अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या पालकांकडं स्मार्टफोन नाहीत. हे विद्यार्थी अभ्यासाच्या या प्रक्रियेपासून दूर जाऊ नयेत यासाठी कॉन्फरन्स कॉल हा वरदान ठरू शकेल. 

कॉन्फरन्स कॉल चालू असताना त्याचं कॉल रेकॉर्डिंग करता येऊ शकतं, ज्या माध्यमातून मुलांच्या अभ्यासाचं डॉक्‍युमेंटेशनही करता येईल. स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून "स्मार्ट शिक्षण' देता येऊ शकतं, तेही कोणत्याही इंटरनेट सुविधेशिवाय. तसंच कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून सर्व एकत्र अभ्यास करत असल्याचा अनुभवही मुलांना देता येतो. 

- राजकिरण चव्हाण
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT