E Flash Card. 
Blog | ब्लॉग

आधुनिक शैक्षणिक युगात "ई-फ्लॅशकार्ड' प्रभावी माध्यम 

राजकिरण चव्हाण

दैनंदिन अध्यापन कार्यात शैक्षणिक साहित्याचा वापर करणं आवश्‍यक असतं. कारण, शिक्षकांनी शिकवत असताना शैक्षणिक साहित्याचा वापर केला तर त्यांचं अध्यापन प्रभावी तर होतंच, त्याचबरोबर मुलांचं अध्ययनही चांगलं होतं. फ्लॅशकार्ड, मणीमाळा, नकाशे, तक्ते, विविध वस्तूंच्या प्रतिकृती आदी शैक्षणिक साहित्य अध्यापन करताना वापरलं जातं. यातील फ्लॅशकार्ड हे एक प्रभावी शैक्षणिक साहित्य म्हणून वापरलं जातं. "फ्लॅशकार्ड' म्हणजे कागदाचा चौकोनाकृती तुकडा, ज्यावर विविध शब्दं, विविध अक्षरं, विविध चित्रं असतात, ज्याचा अध्यापनाच्या गरजेनुसार वापर करून अध्ययन-अध्यापन प्रभावी केलं जातं. फ्लॅशकार्ड आपण स्वतः हाताने पण बनवू शकतो किंवा विकतही मिळू शकतं. 

आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक साहित्यांच्या प्रकारात बदल होताना दिसत आहे. जसे फ्लॅशकार्ड ऐवजी ई-फ्लॅशकार्डचा वापर केला जात आहे. फ्लॅशकार्ड म्हणजे एम. एस. वर्ड, पीपीटी स्लाईडला पीडीएफ वा फोटोमध्ये रूपांतरित करणं व या माध्यमातून अध्यापन प्रभावी करणं होय. अध्यापन करताना आवश्‍यक असणारे स्लाईड अथवा फोटो यांचा फ्लॅशकार्ड ऐवजी "ई-फ्लॅशकार्ड' म्हणून मोबाईल, स्मार्ट टीव्ही, कॉम्प्युटरवर उपयोग करता येतो. 

नेहमीच्या फ्लॅशकार्ड ऐवजी ई-फ्लॅशकार्ड हाताळणं सोयीचं असतं, त्याचबरोबर हे साहित्य कधीही खराब होत नाही. ते तयार करण्यासाठी काहीही खर्च होत नाही. गूगल मीट, झूम मीटिंग, गूगल क्‍लासरूम आदी ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये या ई-फ्लॅशकार्डचा वापर वाढतो आहे. 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT