Video Editing 
Blog | ब्लॉग

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती (भाग 2) 

राजकिरण चव्हाण

मागील भागामध्ये आपण पाहिलं की, मोबाईलवर शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती कशी करावी यासंदर्भातली माहिती. आजच्या लेखामध्ये कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून व्हिडीओ निर्मिती कशी करायची, हे पाहणार आहोत. अनेकदा मोठमोठे व्हिडीओ एडिट करताना मोबाईलपेक्षा कॉम्प्युटर जास्त उपयुक्त ठरतो. अनेक असे सॉफ्टवेअर्स आहेत की ज्या माध्यमातून एडिटिंगच्या जास्तीत जास्त गोष्टी करता येतात. कॉम्प्युटरवर व्हिडीओ निर्मिती करण्यासाठी विंडोज मूव्ही मेकर, हिट फिल्म एक्‍सप्रेस, ओपन शॉट यांसारखे फ्री सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत; तर वंडरशेअर फिल्मोरा, कॅम्टेशिया यांसारखी पेड सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत. साहजिकच पॅड सॉफ्टवेअरमध्ये फ्रीपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात, ज्यामुळे व्हिडीओ निर्मिती अगदी प्रोफेशनली करणं शक्‍य होतं. 

कॉम्प्युटरवर व्हिडीओ निर्मिती करण्याचा फायदा हा असतो, की मोबाईलमध्ये येणारी स्टोअरेजची मर्यादा इथे काही प्रमाणात का होईना सोडवली जाते. तसेच खूप व्हिडीओ, मोठ्या साईजचे व्हिडीओ कॉम्प्युटरवर करणंही सोयीचं होतं. एडिटिंग करताना कॉम्प्युटरची असलेली स्क्रीन ही मोठी असल्यामुळे आणि बारीकसारीक चुका आपल्याला या माध्यमातून कमी करता येऊ शकतात, ज्यामुळे व्हिडीओ क्वालिटी मेंटेन करणे शक्‍य होतं. 

आज लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शिक्षण देताना व्हिडीओ निर्मिती गरजेची आहे, हे लक्षात आलं असेलच. अनेक वेळा मोबाईलवर ज्या गोष्टीला मर्यादा येतात त्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हिडीओ निर्मितीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. खास करून क्रोमा इफेक्‍ट देण्यासाठी आपल्याला अशा सॉफ्टवेअरची जास्त मदत होऊ शकते. 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT