hadpasar.jpg 
Citizen Journalism

माझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड

संदीप जगदाळे

पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड, जास्वंद, अडुळसा, गवती चहा, मिरची, भेंडी, गवार, अळू, कढीपत्ता, मेथी ते गुलाब आदी भाज्या व फुलझाडांचा मळा शेतात नव्हे तर; पुण्यातील गोंधळेनगर मधील योगेश गोंधळे यांच्या घरातील टेरेसवर फुलला आहे.
आवड म्हणून त्यांनी हा मळा स्वकष्टाने जोपासला आहे. यानिमित्ताने किचनमध्ये लागणारा भाजीपाला आपण घरीच निर्माण करू शकतो, हे गोंधळे यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. तसेच किचनमधील ओला कच-या पासून कंपोस्ट खत देखील ते तयार करतात.   
गोंधळे म्हणाले, या झाडांकरता कोणते ही रासायनिक खत न वापरता फक्त जैविक पद्धतीने झाडे लावली आहेत. खतांमध्ये शेणखत, जीवामृत व कम्पोस्ट खत वापरले जाते. त्यामध्ये घरातील कचरा घरात जिरवला जातो. घरा बाहेरील पाला पाचोळा गोळा करून देखील त्याचे ही खत बनवले जाते, झाडांना फुले जास्त येण्यासाठी कांद्याच्या टरफलांचे पाणी वाफारले जाते. सेंद्रीय खताचा वापर केल्यामुळे भाज्यांना चव देखील चांगली येते. तसेच रासायनिक खतापासून शरिरावर होणारे दुष्परिणाम देखील टळतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT