Crime: दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीचा केला खुन, न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा  sakal
Crime | गुन्हा

Crime: दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीचा केला खुन, न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

Sangali : दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Latest Crime Update: दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन पत्नीचा खून करणारा पती गणपत दाजी पवार ( वय ५०, मुळ - आंबेगांव, ता. मावळ, जि. पुणे, सध्या - धनगांव, ता. पलूस, जि. सांगली ) यास दोषी धरून विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले.

आरोपी गणपत पवार याने त्याची पत्नी कांताबाई हिने दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन चिडून शिवीगाळ करुन काठीने तिचे तोंड, पाय व पाठीवर तसेच कोयत्याने कपाळावर उजव्या बाजुस, हनवटी, गळ्यावर मारुन गंभीर जखमी करुन तिचा १८ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे चारच्या सुमारास धनगांव गावच्या हद्दीत शेतजमीन गट नंबर ४१२ मध्ये असलेल्या झोपडीमध्ये खून केला होता. याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड ( तागडखेल, ता. आष्टी, जि. बीड ) यांनी भिलवडी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी गणपत पवार यास अटक करण्यात आली होती.

७ ऑक्टोबर २०२१ पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदरचा गुन्हा विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. त्याची सुनावणी सुरू होती. आज आरोपीस दोषी धरून त्यास वरील शिक्षा सुनावण्यात आली. असे श्री. पालवे यांनी सांगितले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक संदिप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे, तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, चंद्रकांत कोळी, मंगेश गुरव, तानाजी देवकुळे, धीरज खुडे, विशाल पांगे यांनी केला. सदर गुन्ह्याचे सुनावणीकामी सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे, कोर्ट अंमलदार अंकुश लुगडे, माधुरी सदाकळे यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT