Theft esakal
Crime | गुन्हा

Crime News: एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; दागिने व रोख रक्कम लंपास

राजकुमार शहा

घरातील सदस्य परगावी गेल्याची तसेच अन्य सदस्य झोपल्याची संधी साधून घराचा दरवाजा उघडून तीन ठिकाणी घरफोड्या करून, चोरट्यांनी सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा एकूण तीन लाख 68 हजाराचा ऐवज ऐन दिवाळीत चोरून नेल्याची घटना अनगर ता मोहोळ येथे शनिवार व रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, अनगर येथील रहिवासी सुरेश दिगंबर गुंड हे कुरकुंभ ता दौंड येथील बहिणीकडे गेले होते. बहिणीच्या घरी असतानाच सुरेश गुंड यांना त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला व तुमच्या घरी चोरी झाली आहे तुम्ही लवकर या असा निरोप दिला. गुंड हे तातडीने अनगर येथील राहत्या घरी सकाळी 11 वाजता पोहोचले.

घटने दिवशी गुंड यांची पत्नी बेडरूम मध्ये झोपली होती, तर आई सुशीला ही घरासमोर झोपली होती. पहाटे साडेतीन वाजता सुशीला यांना घरा बाहेर आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातील फुले झुबे दिसून आले नाहीत. बेडरूम मधील कपाट उघडे दिसले, घरातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम मिळून आली नाही. त्यामुळे चोरी झाल्याची घटना खात्री झाली.

दरम्यान अनगर येथीलच अमर बजरंग शिंदे, गणेश श्रीमंत गोटे व तानाजी शाहू बोडके यांच्याही घरी चोरी होऊन सोन्याचे विविध दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला. चौघांचा मिळून एकूण तीन लाख 68 हजाराचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी सुरेश दिगंबर गुंड रा अनगर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT