ashadi wari 2023 vitthal warkari rain weather monsoon wari  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : पांडुरंगा! आता बरस बाबा; पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आर्त हाक

फलटणमध्ये पालखी तळावर रात्रीपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

विलास काटे

फलटण : रणरणते ऊन...पाण्याच्या टॅंकरवर होणारी गर्दी...धुळीचे लोट... विसाव्याला सावली नाही....अशी सत्वपरीक्षा पाहणारी वाटचाल. केवळ हरिनामाच्या बळावर फलटण ते बरड ही वाटचाल पार पडली. ‘‘पांडुरंगा, आता अंत नको पाहू बरस बाबा,’’ अशी आर्तता वारकऱ्यांमध्ये बोलली जात आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. २३) सोहळा सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरीमध्ये प्रवेश करणार आहे.

फलटणमध्ये पालखी तळावर रात्रीपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सातारा जिल्ह्यातून अनेक भाविक येत होते. दरम्यान, पहाटे माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर चोपदार बंधूंनी विणेकऱ्यांच्या हजेऱ्या‍ घेतल्या. खांदेकऱ्यां‍नी पालखी रथामध्ये विराजमान केली.

सव्वा सहाला सोहळा बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी फलटण नगरीतील अनेक भाविक सोहळ्याला निरोप देण्यासाठी चालत होते. साडेनऊ वाजता सोहळा विडणी येथे न्याहारीसाठी थांबला. फलटण ते विडणी वाटचालीत काही भागात वृक्षराजी होती. तेथे चालताना वारकऱ्यांना सावलीचा आधार मिळाला. पण न्याहारीनंतर हळूहळू सूर्य तळपू लागला. पारा चढू लागला.

वारकऱ्यांनी छत्री, उपरणे मिळेल, त्या साधनांनी डोके झाकून घेतले. विडणीपासून वारकऱ्यांची सत्वपरीक्षाच होती. वाटचालीत उन्हाचीच चर्चा होती. आळंदीत सोहळा निघाल्यापासून संपूर्ण वाटचालीत ऊन होते. अधूनमधून ढग आल्यासारखे वातावरण निर्माण होत होते. पण क्षणातच पुन्हा उन्हाची तिरीप सुरू होत होती. धुळीचा त्रास होत होता. निंबळक फाट्याचा विसावा घेऊन पालखी सोहळा बरड येथे मुक्कामी विसावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

SCROLL FOR NEXT