Astro Tips sakal
संस्कृती

Astro Tips : सोमवारी हे उपाय केल्याने चंद्रदोष दूर होतो

शंकराची उपासना केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते

सकाळ डिजिटल टीम

शिव शंकरांनी चंद्र देवाला आपल्या माथ्यावर धारण केलेले आहे; त्यामुळे शंकराची उपासना केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते.

ज्योतिषशास्त्रात चंद्राचे खूप महत्व आहे. चंद्राच्या शीतलता आणि शांततेसाठी तो ओळखला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र अशुभ स्थितीत असेल तर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चंद्र ग्रह दोषाचा आयुष्यात शारीरिक आणि मानसिक गोष्टींवर वाईट परिणाम होतो.

ज्योतिषांच्या मते, जर कुंडलीत चंद्र शुभ स्थितीत असेल तर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात पण जर चंद्र अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या येऊ लागतात. चंद्र दोषामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तणाव वाढतो. कोणतेही काम करण्याची इच्छा नसते.

चंद्रदोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

- दर सोमवारी नियमितपणे शिवाची पूजा करावी, ओम श्रम श्रीं श्रम सह चंद्रमसे नमः या मंत्राचा १०८ वेळेस जप करावा.

- दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर चांदीच्या कलशाने दुधाचा अभिषेक करावा. आणि सोबत पांढरे वस्त्र, चंदन किंवा दही अशा पांढऱ्या गोष्टी अर्पण कराव्या.

- चंद्रग्रह दोष दूर करण्यासाठी सोमवारी मोत्याची अंगठी सिद्ध करून धारण करावी. यामुळे मन शांत राहते आणि आयुष्यात सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी नांदते. चंद्र देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे त्रास, रोग आणि दोष दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

भाजप नेत्यांना फिरू देणार नाही! जरांगेंचा दिल्लीतून इशारा; जंतरमंतरवर आंदोलकांची घेतली भेट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, तर धर्मेंद्र प्रधान ओम बिर्लांच्या भेटीला

Delhi Protest '...त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके', लाठीमारात जखमी नागपूरच्या तरुणाच्या कुटुंबीयांचा संताप

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

SCROLL FOR NEXT