Chandra Grahan 2023 watch lunar eclipse in india other country usa australia europe marathi news  esakal
संस्कृती

Chandra Grahan 2023  : वर्षातील आज शेवटचे चंद्रग्रहण ! भारतासह इतर खंडात कधी आणि कुठे पाहू शकता?

भारतासह आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्टेलिया खंडात दिसणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण शनिवारी रात्री दिसणार आहे. या वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण आहे. २८ ऑक्टोबरला मध्यरात्री भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे.

हे ग्रहण भारतासह आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,ऑस्टेलिया खंडातून दिसेल. सर्व खगोलप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी हे ग्रहण पाहावे, असे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

२८ ऑक्टोबरला मध्यरात्री शरद पौर्णिमेला चंद्र मेष राशीत दिसेल. चंद्रग्रहणाची सुरुवात ११.३१ वाजता छायाकल्प चंद्रग्रहणाने सुरू होईल.१.०५ मिनिटाने खंडग्रास ग्रहण सुरुवात होईल. १.४४ ला सर्वाधिक ग्रहण दिसेल. यावेळी चंद्र १० ते १२ टक्के ग्रस्तोदित असेल.

२.२२ मिनिटाने खंडग्रास ग्रहण संपेल. परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण ३.५६ वाजता संपेल. संपूर्ण ग्रहणाचा काळ ४.२५ तासांचा तर खंडग्रास ग्रहण १.१८ तासाचे असेल. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते. हे या वर्षांतील शेवटचे ग्रहण असेल.

कोजागिरी पौर्णिमेवर ग्रहणाचे सावट

शनिवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० पासून रविवारी २९ च्या पहाटे २.२३ वाजेपर्यंत नागपूर विभागात खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध लागत आहेत. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त करावयाची पूजा, दुधाचा नैवेद्य इत्यादी ग्रहण लागण्यापूर्वी करता येईल.

प्रसाद म्हणून एक पळी दूधप्राशन करावे, उरलेले दूध दुसऱ्या दिवशी घ्यावे, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. ग्रहण स्पर्श २८ ऑक्टोबरला रात्री १.०५ मिनीट, ग्रहण मोक्ष २९ च्या पहाटे २.२३ मिनिटांनी होणार आहे. ग्रहणाचा पर्वकाल १ तास १८ मिनिटे राहील.

चंद्रग्रहण का घडते!

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्रग्रहण होते. चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत.

यावेळेसचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील आहे. याच महिन्यात १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एकामागोमाग येत असतात. चंद्र-गुरू ग्रहाची युती पाहण्याची संधी आहे. शरद पौर्णिमेला होणाऱ्या ह्या ग्रहणावेळी चंद्रासोबत पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती दिसेल. गुरू ग्रह पुढील आठवड्यात पृथ्वी जवळ येत असल्याने आकाराने मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT