Ganesh Festival Special esakal
संस्कृती

Ganesh Festival Special : गणेशाला 'गजा'चे म्हणजेच हत्तीचे मुख का आहे?

'गज' शब्दाने कैवल्यमुक्ती देणारी अशी कोणती देवता असेल तर ती भगवान गजानन ही होय.

गौरव देशपांडे

Ganesh Festival Special : भगवान गणेशाचे मस्तक हे गजमस्तक आहे. गणेशास दुसरे नाव 'गजानन', 'गजवदन' असे देखील आहे. आता प्रश्न असा की पडतो की, गणेशाला 'गजाचे' म्हणजेच हत्तीचे मस्तक का आहे? याविषयी ब्रम्हवैवर्तपुराणात सांगितलेली कथा सर्वांना माहितीच आहे. कोणत्याही कथेचा एक व्याच्यार्थ असतो आणि दुसरा लक्ष्यार्थ असतो. आता गज या शब्दाकडे वळूयात. 'गज' हा संस्कृत शब्द आहे. या शब्दातील 'ग' कार हा गर्भयातना थांबविणारा आणि 'ज'कार हा जन्ममरणविच्छेद करणारा या अर्थाने आहे. अर्थात 'गज' शब्दाने कैवल्यमुक्ती देणारी अशी कोणती देवता असेल तर ती भगवान गजानन ही होय.

संख्याशास्त्रानुसार 'गज' शब्दाने ८ ही संख्या व्यक्त होते. भारतीय संख्याशास्त्रात आकडे हे विशिष्ट शब्दाने व्यक्त करायची पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. उदा. ४ आकडा वेद या शब्दाने, ३ आकडा अग्नी या शब्दाने व्यक्त होतो. त्याचप्रमाणे गज शब्दाने ८ ही संख्या व्यक्त होते. आठही दिशांना जो संपूर्णपणे व्याप्त आहे, असा तो गजानन होय. (Ganesh Chaturthi Festival)

त्याचप्रमाणे स्वरशास्त्रानुसार 'गज' शब्दातील 'ग'कार हा ३ संख्या दर्शवितो आणि 'ज'कार हा पण ३ संख्या दर्शवितो. 'गज' शब्द एकत्र लिहिल्यास ३३ ही संख्या येते. ३३कोटी अर्थात ३३ प्रकारच्या देवतांचा अधिपती तो गजानन होय. या ३३ देवता कोणत्या ते शतपथ ब्राम्हणात सांगितलेले आहे, १२ आदित्य, ८ वसू, ११ रुद्र, २ अश्विनीकुमार मिळून ३३ देवता होतात. थोडक्यात गणपतीला 'गज' मस्तकच का? तर 'गज' शब्दाने इतके गूढ अर्थ अभिव्यक्त होतात ते इथे घेणे अभिप्रेत आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT