Guru Purnima 2023 Shridi Sai Baba Mahatva esakal
संस्कृती

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला साईबाबांच्या पूजेचं काय आहे महत्व? जाणून घ्या

Guru Purnima 2023 Shridi Sai Baba Mahatva: गुरुपौर्णिमेला जगाच्या कानाकोपऱ्यातून साई बाबांचे भक्त दर्शनासाठी येतात

सकाळ डिजिटल टीम

Sai Baba Shirdi Guru Purnima Importance : गुरु पौर्णिमेला साईबाबांच्या पूजेला भक्त विशेष महत्व देतात. यासाठी भाविक गावागावातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात. साई सच्चरित वरून मानले जाते की, साई बाबांची पूजा गुरु पौर्णिमेदिवशी प्रथम तात्या साहेब नूलकर यांनी केली होती. असे मानले जाते की, साई बाबांनी आपल्या भक्तांना गुरूंची पूजा करण्याचे ज्ञान दिले होते.

गुरुपौर्णिमा हा गुरुकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे. गुरू या शब्दाची उत्पत्ती हि 'गु' आणि 'रू' या शब्दांपासून झाली आहे. 'गु' या शब्दाचा अर्थ 'अज्ञानाचा अंधार' आणि 'रु' या शब्दाचा अर्थ 'याला दूर करणारा' असा होतो.

देश विदेशातील लाखो लोक साई बाबांचे भक्त आहेत. गुरुपौर्णिमेला जगाच्या कानाकोपऱ्यातून साई बाबांचे भक्त दर्शनासाठी येतात. साईसच्चरितच्या १७ व्या अध्यायामध्ये लेखक हेमाडपंत यांच्याकडून गुरूंचे महत्व सांगण्यात आले आहे.

हेमाडपंत सांगतात की, रोज शास्त्रग्रंथ ऐकले पाहिजेत. पूर्ण श्रद्धेने आपल्या गुरुंचे आपण ऐकले पाहिजे. यामुळे आपण आपल्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाही आणि आपण आपल्या जीवन उद्धाराकडे मार्गस्थ होतो. गुरुच्या उपदेशाने अगणित लोकांचा उद्धार होतो, आणि त्यांच्या मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

पुढे हेमाडपंत सांगतात की, चांगल्या शास्त्रांचे वाचन करा किंवा ते ऐका. पूर्ण श्रद्धेने आणि आदरपूर्वक आपल्या गुरूंच्या चरणी लीन व्हा. त्यानंतर गुरु आपले आयुष्य ज्ञानाने उजळून टाकतील. गुरुंच्या सेवेत आपले सर्वस्व अर्पण करा.

गुरूंकडून ज्ञान आणि मोक्ष यांच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. गुरूकडून उत्तम ज्ञानाची प्राप्ती होते आणि ती आपले आयुष्य सुखकारक बनवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT