Guru Purnima 2025 significance and rituals in Marathi: Sakal
संस्कृती

Guru Purnima 2025: आज गुरुपौर्णिमा, जाणून घ्या पुजा करण्याची विधी अन् महत्व

Guru Purnima 2025 significance and rituals in Marathi: गुरूंच्या कृपेमुळे जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी येते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे महत्त्वाचे आहे.

Puja Bonkile

Guru Purnima 2025: हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा १० जुलैरोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरूंच्या कृपेमुळे जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी येते असं मानलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे जीवनात यश आणि प्रगती होते. गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त अन् महत्व काय हे जाणून घेऊया.

यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे?

यंदा गुरुपौर्णिमा १० जुलै २०२५, गुरुवारी साजरी केली जाणार आहे. सकाळी १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ जुलै रोजी पहाटे २ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल. यामुले १० जुलैरोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

गुरुपौर्णिमेचा पूजा विधी

पहाटे लवकर उठून स्नान करावे.

स्वच्छ आणि नवीन कपडे परिधान करावेत.

देवाचे नामस्मरण करून दिवसाची सुरवात करावी.

सूर्यदेवतेला अर्घ्यदान करावे.

पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णू आणि वेदव्यास यांच्या मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी.

मूर्ती किंवा फोटोवर फुले, धूप, दीप, अक्षता अर्पण करावीत.

तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि गुरूकवचाचे पठण करावे.

देवाला फळे, मिठाई, खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

बुद्धिमत्ता किंवा ज्ञानासाठी उपयुक्त पुस्तकाची पूजा करू शकता.

गरिबांना अन्न, दक्षिणा, कपडे किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

महत्व

गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्मिमा म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला होता. या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वेद व्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली होती. त्यामुळे याला व्यास पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिष्य आपल्या गुरुंची पूजा करुन आशीर्वाद घेतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT