Lord Hanuman esakal
संस्कृती

Hanuman Jayanti : 'या' शुभ मुहूर्तावर करा बजरंगबलीची पुजा, कुटूंबाला होणार लाभ

यावर्षी हनुमान जयंती केव्हा आहे आणि पुजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Hanuman Jayanti : राम भक्त हनुमान यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथिला साजरी केली जाते. देशाच्या काही भागात अन्य तिथिंवरही हनुमान जयंती साजरी करावी लागते. पौराणिक कथेनुसार, हनुमानजी हे रुद्रावतार आहे. त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी झाला होता.

त्यांचे वडील वानरराज केसरी आणि मातेचं नाव अंजना आहे. हनुमानजीचा जन्म भगवान रामाच्या सेवेसाठी झाला होता. त्यांनी सीता माताचा शोध आणि लंका विजय करण्यात भगवान रामाची मदत केली होती. 

यावर्षी हनुमान जयंती केव्हा आहे आणि पुजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? फायदे काय आहेत? आज आपण या वर्षी जाणून घेणार आहोत.

हनुमान जयंती तिथी

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी 05 एप्रिल बुधवारला सकाळी 09:19 वाजता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तिथी सुरू होणार तर 06 एप्रिलच्या दिवशी गुरुवारी सकाळी 10:04 वाजता ही तिथी संपणार. अशात हनुमान जयंती 06 एप्रिल म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाते. या दिवशी पुजा केली जाते. हनुमानाची आराधना केली जाते.

हनुमान जयंती 2023 पूजा मुहूर्त
06 एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पूजा करावी. सकाळी 06 वाजता 06 मिनिटपासून शुभ मुहूर्त सुरू होणार जो सकाळी 07 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार. त्यानंतर दुपारी 12 वाजून 24 मिनिटांपासून दुपारी 01 वाजून 58 मिनिटपर्यंत लाभ होणार.

ज्या लोकांना हनुमान जयंतीची पूजा करायची असेल त्यांनी रात्रीच्या वेळी 05 वाजून 07 मिनिटांपासून रात्री 08 वाजून 07 मिनटांपर्यंत करावी. हनुमान जयंतीचा 05:07 वाजल्यापासून सायंकाळी 06:42 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. सायंकाळी 06 वाजून 42 मिनटांपासून 08 वाजून 07 मिनटपर्यंत अमृत मुहूर्त आहे.

हनुमान जयंती पूजा
06 एप्रिलला हनुमान जयंतीची पूजा शुभ मुहूर्तावर करा. हनुमानजींना लाल पुष्प, सिंदूर, अक्षत्, पानाचा वीडा, मोतीचूर लाडू, लाल लंगोट इत्यादी अर्पण करावे. त्यानंतर हनुमान चालीसा पठन करावे. हनुमान मंत्र जाप आणखी कल्याणकारी असतो. त्यानंतर हनुमानजीची आरती करावी. हनुमानाच्या कृपेने तुमच्या कुटूंबात भरभराट होणार अन् संकट दूर होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT