संस्कृती

Happy New Year 2024 : संपूर्ण वर्षभर राहाल मालामाल; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा हे उपाय

Aishwarya Musale

नवीन वर्ष 2024 आजपासून सुरु झाले आहे. नवीन वर्ष खास बनवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. कारण, 2024 हे वर्ष आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो, समस्या संपल्या पाहिजेत, घरात लक्ष्मीचा वास असावा आणि आर्थिक संकट दूर व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही असेच काही वाटत असेल तर तुम्ही काही उपाय अवश्य करून पाहा. आजपासून नवीन वर्ष 2024 सुरू झाले आहे.

हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. त्यामुळे वर्षाचा पहिला दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी केलेल्या उपायांनी मनोकामना पूर्ण होतात. तुमचे जीवन यशस्वी आणि आनंदी बनवण्यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज १ जानेवारीला तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

शंकराला बेलपत्र अर्पण करा. आज तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद द्यावा. आम्ही तुम्हाला सांगतो की महादेवाला बेलपत्र खूप आवडते. अशा स्थितीत सोमवारी म्हणजेच आज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. हा उपाय करणार्‍या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

बजरंगबलीची पूजा- संकटमोचन हनुमानाची पूजा संकट दूर करण्यासाठी म्हणून केली जाते. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज हनुमानाची पूजा करणे शुभ आणि लाभदायक आहे. आज बजरंगबलीची पूजा केल्यानंतर संकल्प करा. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाहीत. 

दान करणे देखील शुभ - मान्यतेनुसार, वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला उबदार कपडे किंवा अन्न दान करणे शुभ असते. असे केल्याने केवळ व्यक्तीचे कल्याण होत नाही तर घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरण सकारात्मक राहते. तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. असे केल्याने मनुष्य सर्व रोगांपासून मुक्त होतो.

श्री यंत्र स्थापना - ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये धन, कीर्ती आणि सौभाग्य वाढवण्यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची रोज पूजाही करावी. दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी. यंत्राला गंगेच्या पाण्याने आंघोळ घालावी आणि “ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम:” या मंत्राचा जप करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT