Paduka Darshan Sohala 2024 sakal
संस्कृती

Paduka Darshan Sohala 2024 : ॐकार ही ‘ऑल इज वेल’ संकल्पना ; सुनील तांबे यांचे प्रतिपादन

ॐकार एक स्पंदन आहे, त्यापासून ब्रह्मांडाची सुरुवात झाली आहे. मला जेव्हा मन शांत वाटत नाही, मी तणावात असतो, तेव्हा मी ॐकार करतो.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ॐकार एक स्पंदन आहे, त्यापासून ब्रह्मांडाची सुरुवात झाली आहे. मला जेव्हा मन शांत वाटत नाही, मी तणावात असतो, तेव्हा मी ॐकार करतो. ॐकार ही ‘ऑल इज वेल’ संकल्पना आहे, असे ‘संतुलन आयुर्वेद’चे एमडी सुनील तांबे यांनी सांगितले. त्यांनी यावेळी ॐकाराची महती सांगितली.

या वेळी सुनील तांबे म्हणाले की, आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. ॐकार म्हणण्याने पूर्ण शरीरातील पंचमहाभूतांचे संतुलन करता येते. आपले स्वास्थ्य चांगले राहते. ॐकार आपला मित्र होऊ शकतो. ॐकाराचे तीन प्रकार आहेत. त्यांचे उच्चारण कसे करावे, याचेही मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

ॐकार तीन प्रकारे म्हणता येतो. ऱ्हस्व म्हणजे अत्यंत कमी वेळात म्हटलेला. जलद ॐकार म्हणताना पोटाची हालचाल लोहाराच्या भात्यासारखी होते. ऱ्हस्व ॐकार म्हटल्याने भस्त्रिका, कपालभाती केल्याचा लाभ होतो आणि तो शरीराच्या खालच्या भागावर अधिक कार्य करतो. दीर्घ पद्धतीने ॐकार म्हटला तर छाती व फुप्फुसांवर कार्य करतो आणि लोम-अनुलोमचा लाभ देतो.

अनुनासिकयुक्त प्लुत पद्धतीने म्हणजेच अतिशय लांबवून ॐकार म्हटला तर मस्तकावर काम करतो. ॐकार गुंजनातून ऐकू येणारी आस किंवा वातावरणाने दिलेल्या प्रतिध्वनीकडे लक्ष ठेवावे. म्हणजे ऱ्हस्व ॐ म्हणताना ‘अ’काराला, दीर्घ ॐ म्हणताना ‘उ’ काराला, प्लुत ॐ म्हणताना ‘म’काराला महत्त्व दिल्यासारखे आहे, असेही तांबे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

IND W vs ZIM W: प्रतिका रावलचं शतक अन् शेफाली वर्माची वादळी खेळी! झिम्बाब्वेला लोळवत भारतीय महिलांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

Piyush Goyal : जर्मनीतील भारतीयांनी भारतातील तरुणांच्या कौशल्याला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT