Shani Jayanti 2022  esakal
संस्कृती

Shani Jayanti 2022: साडेसातीपासून वाचण्यासाठी अवश्य करा हे उपाय; त्रासांपासून मिळेल मुक्ती

ज्योतिष शास्त्रामध्ये, शनिदेवाला न्यायाची देवता आणि कर्मांचं फळ देणारा मानलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

Shani Jayanti 2022: ज्योतिष शास्त्रामध्ये, शनिदेवाला न्यायाची देवता आणि कर्मांचं फळ देणारा मानलं जातं. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. चांगली कृत्ये करणाऱ्यांना चांगली आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा होते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असते, त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता नसते. परंतु शनिदेवाच्या वक्रदृष्टीमुळे व्यक्तीचा सर्वनाश होतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, शनि जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी शनि जयंती 30 मे 2022, सोमवारी आहे. या दिवशी ज्या लोकांवर शनि ढैय्या (अडीच वर्षांचा प्रभाव) आणि शनीची साडेसाती चालू आहे, त्यांनी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय अवश्य करावेत. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंतीचा दिवस सर्वोत्तम मानला जातो.

या राशींवर साडेसातीचा प्रभाव-

सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. अशा स्थितीत कुंभ, मीन आणि मकर राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव पडतो. कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनी ढैय्या चालू आहे. यावर्षी शनि जयंतीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. ग्रहांची ही स्थिती सुमारे 30 वर्षांनंतर तयार होत आहे. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खाली सांगितलेले उपाय अनेक पटींनी फलदायी ठरू शकतात.

शनि जयंतीच्या दिवशी करा हे खास उपाय-

1. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करताना ‘ओम शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा आणि शनि चालिसाचा पाठ करावा.

2. शनि जयंतीच्या दिवशी दान करणे खूप लाभदायक मानले जाते. या दिवशी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहा. त्यानंतर ती भांड्यासोबत कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा किंवा शनि मंदिरात ठेवून द्या.

3. शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन पूजा करा. त्यानंतर शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे तीळ आणि काळे उडीद अर्पण करावे.

4. शनि जयंतीच्या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा.

5. शनि जयंतीला धन, काळे वस्त्र, तेल, अन्न, तीळ, उडीद इत्यादी दान करणे शुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT