Margashirsha Month 2023
Margashirsha Month 2023 esakal
संस्कृती

Margashirsha Month 2023 : मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार कधी? जाणून घ्या महालक्ष्मीच्या पूजेची पद्धत आणि व्रताचे महत्व

Monika Lonkar –Kumbhar

Margashirsha Month 2023 : मार्गशीर्ष महिन्याला खास महत्व आहे. हा महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीला ही समर्पित आहे. या महिन्यात मात लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते. महाराष्ट्रात या वर्षी १३ डिसेंबरला म्हणजे उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होत आहे.

मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यावर, प्रत्येक गुरूवारी महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरूवारी केले जाते. या महिन्यातील पहिला गुरूवार हा १४ डिसेंबरला आहे.

या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या या व्रताचे आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास असे महत्व आहे. या महिन्यात मांसाहार देखील केला जात नाही. या महिन्यातील प्रत्येक गुरूवारी या व्रताचे उद्यापन केले जाते आणि उपवास केले जातात.

यंदा हा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार कधी आहे? आणि महालक्ष्मीच्या व्रताची पूजा पद्धत आणि महत्व आपण जाणून घेणार आहोत.

यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार कधी ?

या वर्षी महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात ही १३ डिसेंबरपासून होणार आहे. १२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होईल. ही अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होईल.

१३ डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाल्यानंतर हा मार्गशीर्ष महिना ११ जानेवारीला सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी संपणार आहे. या महिन्यात ४ गुरूवार असणार आहेत. या चार गुरूवारी महिला आवर्जून महालक्ष्मीव्रताचे उद्यापन करतात आणि उपवास करतात.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारच्या व्रताच्या तारखा खालीलप्रमाणे :

  • पहिला गुरूवार – १४ डिसेंबर २०२३

  • दुसरा गुरूवार – २१ डिसेंबर २०२३

  • तिसरा गुरूवार – २८ डिसेंबर २०२३

  • चौथा गुरूवार – ४ जानेवारी २०२४

महालक्ष्मी व्रताचे महत्व

मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास असे महत्व आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन केले जाते. या दिवशी महालक्ष्मीची प्रतिकात्मक स्वरूपात पूजा मांडली जाते. कलशाची मांडणी करून महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचली जाते. देवीला नैवेद्य दाखवला जातो.

Margashirsha Month 2023

या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. त्यानंतर, शेवटच्या गुरूवारी महिला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सूहासिनी महिलांना आमंत्रित करतात आणि एकमेकींना वाण देतात.

महालक्ष्मीचे हे व्रत केल्याने घरात सूख-शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे, या व्रताला आणि महालक्ष्मीच्या पूजेला फार महत्व आहे. हे व्रत केल्याने देवीची कृपा राहते आणि जीवनातील संकटे दूर होतात असे ही म्हटले जाते.

महालक्ष्मीच्या व्रताची अशी करा पूजा

  • सकाळी उठल्यावर स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा.

  • त्यानंतर, महालक्ष्मीच्या व्रताचा संकल्प करा आणि पूजेची मांडणी करा.

  • पूजेची मांडणी करताना एक चौरंग किंवा पाट घ्या.

  • त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा.

  • त्यानंतर, तांदळाची रास करून त्यावर पाण्याने भरलेला कलश मांडा. त्यासाठी आंब्याची पाने किंवा नागिणीची पाने यांचा वापर करा. त्यानंतर, त्यात नारळाची स्थापना करा.

Margashirsha Month 2023
  • त्यानंतर, महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. देवीचा मुकूट ही स्थापित करू शकता.

  • मग,त्यासमोर नागिणीच्या पानाचा विडा मांडा.

  • देवीला आणि कलशाला कुंकू, हळद, तांदूळ आणि फुले वाहा.

  • निरांजन लावा आणि रांगोळी काढा.

  • त्यानंतर, महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचा आणि आरती करून नैवेद्य दाखवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT