Tamil Nadu 
देश

Tamil Nadu: दारूमुळे 10 जणांचा मृत्यू, निरीक्षक उपनिरीक्षक निलंबित

बनावट दारू प्यायल्याने तीन महिलांसह दहा जणांचा मृत्यू

धनश्री ओतारी

तमिळनाडूमध्ये बनावट दारूमुळे10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर काहीना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (10 Dead After Consuming Toxic Liquor In Tamil Nadu 2 Arrested)

तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात कथितरित्या बनावट दारू प्यायल्याने तीन महिलांसह दहा जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्लुपुरम जिल्ह्यातील मारक्कनमजवळील एकिरकुप्पम येथील रहिवासी असलेल्या सहा जणांचा रविवारी मृत्यू झाला.

पुढील अधिकार्‍यांनी सांगितले की, शुक्रवारी दोन लोकांचा मृत्यू झाला आणि रविवारी एका जोडप्याचा चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदुरंथागम येथे मृत्यू झाला. या चौघांनीही बनावट दारु पिली होती. २० पेक्षा अधिकजण रुग्णलयात दाखल झाले आहेत.

या घटनेनंतर पोलिस महानिरीक्षक (उत्तर) एन कन्नन यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. सर्व 10 पीडितांनी इथेनॉल-मिथेनॉल पदार्थांनी युक्त मद्य प्राशन केले होते. अशी माहिती समोर आली आहे.

तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात बनावट दारूने मृत्यूच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत आणि आतापर्यंत पोलिसांना या दोन्ही घटनांमधील संबंध असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, परंतु संभाव्य दुवा शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.

आहे. यामध्ये चौघांना वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा दोघांचा अतिदक्षता विभागात असताना मृत्यू झाला. रुग्णालयात ३३ जण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आयजी एन कन्नन यांनी पुढे माहिती दिली की चेंगलपट्टू जिल्ह्यात पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शवविच्छेदन करण्यात आले आहे. चेंगलपट्टू जिल्ह्यातील घटनेप्रकरणी आरोपी अम्मावसई याला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांतील काही आरोपी फरार असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

या दोन्ही घटनांमध्ये उद्योगांमध्ये वापरण्यायोग्य विषारी दारूचा वापर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. बनावट दारूप्रकरणी कर्तव्य बजावत नसल्याबद्दल दोन्ही जिल्ह्यातून तीन निरीक्षक आणि चार उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : नागपुरात रक्ताचं नातं रक्ताळलं! भावानं 30 वर्षीय सख्ख्या बहिणीचा तलवारीनं चिरला गळा; मुलीच्या बचावासाठी गेलेली आईही गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

Bribe Land Record Change : सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी १० हजारांची लाच, महिला ग्राम महसूल अधिकारीचा भ्रष्ट कारभार उघड, दापोलीतील घटना

राज्यातील १२ झेडपी, १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा 'मुहूर्त' ठरला; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

SCROLL FOR NEXT