Karnataka Accident 
देश

Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह 10 जणांचा मृत्यू

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मैसूर : कर्नाटकात कार आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. मैसूर येथील तिरुमकूडालू-नरसिपुरा मार्गावर हा अपघात घडला आहे. (10 people including two children dead in an accident between a private bus and a car in Karnataka)

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर जखमींवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही याच्या देखरेखीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला आहे. "या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह झालेल्या मानवी हानीबद्दल दुःख झालं असून मृतांच्या कुटुंबांचं मी सांत्वन करते तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते" असं राष्ट्रपतींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT