Home Minister Medal Police esakal
देश

Police : तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 151 पोलिसांना मिळणार 'गृहमंत्री पदक'

पोलिसांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'गृहमंत्री पदक' प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'गृहमंत्री पदक' प्रदान करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) 151 पोलिसांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'गृहमंत्री पदक' (Home Minister Medal) प्रदान करण्यात येणार आहे. आज (शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्रालयानं (Union Ministry of Home Affairs) याबाबत सविस्तर माहिती दिली.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार मिळालेत, त्यात सीबीआयचे 15 (CBI), महाराष्ट्र पोलिस 11 (Maharashtra Police), मध्य प्रदेश पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे प्रत्येकी 10, केरळ पोलिस, राजस्थान पोलिस, पश्चिम बंगाल पोलिस आणि इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी 8 पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये 28 महिला पोलिसांचाही देखील समावेश आहे.

खरं तर तपासाच्या बाबतीत चांगलं काम करणाऱ्या पोलिसांना दरवर्षी गृह मंत्रालयाकडून गृहमंत्री पदक दिलं जातं. यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर तपास यंत्रणांकडून पोलिसांची नावं मागविण्यात आली होती. 30 एप्रिलपर्यंत ज्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावं प्राप्त झाली, त्यापैकी 151 जणांची या पदकासाठी निवड करण्यात आली. गतवर्षीही 152 पोलिसांना हे पदक देण्यात आलं होतं, त्यात 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्याआधी 2020 मध्ये 121 पोलिसांना हे पदक देण्यात आलं होतं.

2018 मध्ये 'गृहमंत्री पदक' पुरस्कार देण्यास सुरू

दहशतवादी, गुन्हेगार आणि नक्षलवाद्यांविरोधात यशस्वी कारवाया करणाऱ्या अधिकारी आणि जवानांना दरवर्षी सन्मानित केलं जात असलं तरी, गुन्ह्याचा चांगल्या प्रकारे तपास करून गुन्हेगारांना तुरुंगात टाकणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मात्र सन्मान मिळाला नव्हता. अशा परिस्थितीत, 2018 मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा पुरस्कार सुरू केला, ज्यामध्ये व्यावसायिकता, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कामात असामान्य धैर्य दाखवल्याबद्दल पोलिसांचा सन्मान केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT