suprem court टिम ई सकाळ
देश

Abrogation of Article 370: कलम ३७० रद्द होणार की कायम राहणार? सुप्रीम कोर्टात होणार दररोज सुनावणी

सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत हे निर्देश कोर्टानं दिले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सर्व याचिका कोर्टानं दाखल करुन घेतल्या असून त्यावर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणी घेण्यात येईल असा निकाल दिला आहे. त्यामुळं सरकारच्या हे कलम रद्द करण्याच्या निर्णयाचं काय होणार याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Abrogation of Article 370 SC calls for day to day hearing from August 2)

सुप्रीम कोर्टानं म्हटलं, 2 ऑगस्टपासून सोमवार आणि शुक्रवार वगळता या एकत्रित याचिकांवर दररोज सुनावणी घेण्यात येईल. या सुनावणीदरम्यान, दस्ताऐवजांचं सुटसुटीत संकलन करण्यासाठी कोर्टानं नोडल अधिकारी म्हणून दोन वकिलांची नेमणूक केली आहे. तसेच या याचिकांचं लेखी सबमिशन 27 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानंतर यांमध्ये कोणत्याही अतिरिक्त याचिकांचा समावेश केला जाणार नाही, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आयएएस अधिकारी शाह फैसल आणि कार्यकर्त्या शेहला रशीद यांना कलम 370 रद्द करण्याविरोधात दाखल केलेल्या आपल्या याचिकांचा पाठपुरावा करायचा नाही. तसेच न्यायालयीन रेकॉर्डमधून त्यांची नावे हटवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कोर्टानं त्यांची नावं याचिकाकर्ते म्हणून हटवण्याच्या विनंतीला परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT