sakal
देश

दोन पुत्रांच्या संघर्षात लालूंची धाकट्याला साथ

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव हे त्यांचा ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या बेशिस्त वागणुकीवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव हे त्यांचा ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या बेशिस्त वागणुकीवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही मुलांच्‍या वादात लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना साथ दिली आहे.

यादव कुटुंबातील इतर सदस्यही तेजप्रताप यांच्याबद्दल सध्‍या फारसे बोलत नाहीत. कुटुंबप्रमुख असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्‍या भूमिकेमुळे तेजप्रताप व तेजस्वी या भावंडांमधील मतभेद व मनभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोघांमधील संघर्ष रस्त्‍यावर आल्यानंतर दोघेही रविवारी (ता.२२) दिल्लीला स्वतंत्रपणे गेले. लालू प्रसाद यादव हे दिल्लीत उपचार घेत आहेत.

वडिलांना भेटून स्वतःची बाजू मांडण्याच्या आशेने तेजप्रताप हस्तिनापूरला पोचले, पण लालू त्यांना भेटलेच नाही. ते तेजप्रतापवर एवढे नाराज आहेत की, त्यांची भेटही टाळली. उलट तेजस्वी यादवला भेटून लालू प्रसाद यादव यांनी मोठ्या मुलाची माहिती घेतली. वडिलांच्या भेटीचे छायाचित्रही तेजस्वी यांनी शेअर केले आहे. वडील भेटले नाही तरी आई राबडी देवी आणि बहिणींबरोबरील छायाचित्र तेजप्रताप यादव यांनी शेअर केले आहे.

‘आरजेडी’त काही दिवसांपासून सुरू असलेला वाद लालू प्रसाद यांच्या या पवित्र्याने थांबला असली तरी तेजप्रताप यांचा भूतकाळ पाहता हा वाद शमण्याची चिन्ह नसल्याचे दिसत आहे. तेजप्रताप हे तेजस्वी यादव यांच्याविरोधात जी भाषा वापरत आहेत, ती पाहता दोघांची मने पुन्हा जुळणे सोपे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT