Air India news esakal
देश

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

एअर इंडियाच्या विमानात एक टिश्यू पेपर सापडला होता. त्यावर कुणीतरी बॉम्ब असा शब्द लिहिलेला होता. ते बघून प्रवाशी आणि चालक टीममध्ये खळबळ उडाली. त्यानंतर प्रवाशांना विमानाच्या खाली उतरवलं गेलं. काही तास तपासणी केल्यानंतर विमानात काहीही सापडलं नाही.

संतोष कानडे

नवी दिल्लीः दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्ली-वडोदरा या एअर इंडियाच्या विमानामध्ये क्रू मेंबरला शौचालयामध्ये एक टिश्यू पेपर दिसला. त्यावर 'बॉम्ब' असा शब्द लिहिला होता.

बॉम्बची सूचना मिळताच तात्काळ प्रवाशांना विमानातून खाली उतरवलं गेलं. त्यानंतर विमानात बॉम्बशोधक पथक दाखल झालं. शिवाय डॉग स्क्वॉड टीमनेही सर्च ऑपरेशन सुरु केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानात एक टिश्यू पेपर सापडला होता. त्यावर कुणीतरी बॉम्ब असा शब्द लिहिलेला होता. ते बघून प्रवाशी आणि चालक टीममध्ये खळबळ उडाली. त्यानंतर प्रवाशांना विमानाच्या खाली उतरवलं गेलं. काही तास तपासणी केल्यानंतर विमानात काहीही सापडलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता वडोदरासाठी प्रस्थान करणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये ही घटना घडली. बॉम्ब शब्द लिहिलेल्या टिश्यू पेपरमुळे खळबळ उडाली होती. विमानाचा प्रत्येक कोना आणि प्रवाशांच्या बॅगा तपासण्यात आल्या. परंतु काहीही आक्षेपार्ह आढळलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT