देश

"बँकेचे पैसे बुडवून पळालेले सगळे लोक गुजरातचेच का आहेत?"

सपा नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका करताना हा सवाल उपस्थित केला आहे.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप (BJP)आणि सपामध्ये काटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आणि सपाच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज पुन्हा एकदा अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. जेवढेही लोक बँकेतून पैसे घेऊन पळाले आहेत, ते सर्व लोक गुजरातचेच (Gujrat) का आहे? असा सवाल अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी उपस्थित केला.

अखिलेश यादव यांनी यावेळी देशातील बँकेचे पैसे बुडवून देशाबाहेर गेलेल्या लोकांवरून भाजपवर निशाणा साधला. देशातील जेवढेही लोक बँकांचे पैसे घेऊन पळाले ते सर्व गुजरातचेच का आहेत? असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. जेव्हापासून भाजपचं सरकरा आलं तेव्हापासून अशा घटना वाढल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. एबीबी शिपयार्डमधील बँक घोटाळ्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला असून, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यातच आता कर्हाल इथून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्याविरोधात लढणारे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री आणि खासदार सत्यपाल सिंह बघेल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केंद्र सरकारनं वाढ केली असून त्यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gary Kirsten : भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कोच, आता श्रीलंकेला प्रशिक्षण देणार; T20 World Cup नंतर बोर्डाचा निर्णय

ICC ने जाहीर केली 'टीम ऑफ द टूर्नामेंट', चार भारतीयांचा समावेश, विनिंग कॅप्टन सूर्याला मात्र स्थान नाही, मग कर्णधार कोण?

राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना का दिली स्थगिती? परिवहनमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण...

Iran-Israel war: युद्धाचा भडका! इराणच्या विरोधात दोन तगडे देश मैदानात; आता माघार नाही...

Latest Marathi News Live Update: राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT