Amarnath Yatra 2022 google
देश

अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना, CRPF चे 2 लाख जवान सुरक्षेसाठी तैनात

या यात्रेत देशाच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

या यात्रेत देशाच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.

'बम-बम भोले'च्या घोषणांनी दोन वर्षांनंतर आज वार्षिक अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोनाकाळात ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. समुद्रसपाटीपासून ३, ८८८ मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी भाविकांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी प्रशासनाने सीआरपीएफचे दोन लाख जवान तैनात केले आहेत. (Amarnath Yatra 2022)

अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेल्या पहिल्या तुकडीला बुधवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात जम्मू बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या यात्रेत देशाच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत. यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना उद्या हिमलिंगाचे पहिले दर्शन होणार आहे. दरम्यान, नुनवान आणि बालटाल यात्रेच्या मार्गावरूनही भाविकांना रवाना केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले, अमरनाथ यात्रा भाविकांसाठी खूप महत्त्वाची असल्याचे मानले जाते. सर्व सुरक्षा यंत्रणा आणि विकास यंत्रणांच्या सहकार्याने आम्ही सुरक्षेची तयारी केली आहे. यात्रेकरुंना डोळ्यासमोर ठेवून या सुविधांमध्ये सुधारणा आणि बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढे सिन्हा म्हणाले की, भाविकांच्या सुरक्षेसाठी या यात्रेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफसह सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लोकांची वर्दळ वाढली असल्याने आपत्कालीन काळात आम्ही नवीन तंत्रज्ञान आणि वाहने वापरणार आहोत.

कठुआ जिल्ह्यातील लखनपूर येथे इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणीसोबत शहरातील इतर अनेक भागातून येणाऱ्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे. यात्रेच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून यावर्षी वैद्यकीय सुविधांवर अधिकचे लक्ष केंद्रित केले गेले आहे. 2018 मध्ये आरोग्याच्या कारणांमुळे 100 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. नोंदणी किंवा वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्राशिवाय कोणालाही प्रवास करू दिला जाणार नाही, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. यात्रेकरूंचा प्रवास हा हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३.२५ लाख यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. अनिश्चित हवामान असतानाही सर्वच वयोगटातील यात्रेकरूंमध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT