Amit Shah   esakal
देश

Amit Shah : काँग्रेस-‘एनसी’चे पितळ उघडे; गृहमंत्री शहांची ३७० कलमावरून टीका

‘‘पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने ३७० वे कलम आणि कलम ‘३५- अ’ च्या अनुषंगाने काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे समर्थन केले आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे पितळ उघडे पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने ३७० वे कलम आणि कलम ‘३५- अ’ च्या अनुषंगाने काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे समर्थन केले आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे पितळ उघडे पडले आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसचा इरादा एक असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही वर्षांपासून भारतविरोधी लोकांना साथ देत आहेत,’’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

‘‘जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता आली तर विशेष राज्याचा दर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. त्याचा संदर्भ देत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘‘काश्मीरमध्ये ३७० वे कलम परतू शकते,’’ असे विधान केले होते. या मुद्द्यावरून

गृहमंत्री शहा यांनी काँग्रेस- नॅशनल कॉन्फरन्सला लक्ष्य केले आहे. ‘‘लष्कराने एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर गांधी यांनी पुरावे मागितले होते. लष्कराच्या अनुषंगाने ते आपत्तीजनक भाषेचा वापर करतात.

३७० वे कलम परत आणण्याचा पाकिस्तान व काँग्रेसचा इरादा असला तरी केंद्रात मोदी सरकार सत्तेत आहे हे या लोकांनी लक्षात ठेवावे. काश्मीरमध्ये ३७० वे कलम आणि दहशतवाद कधीही परतणार नाही,’’ असे शहा यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

निवडणुकीच्या काळात विरोधी राजकीय पक्षांनी पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेण्याचे काम चालविले आहे. जम्मू- काश्मीरच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे आसिफ यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अब्दुल्ला कुटुंब आणि कॉंग्रेसचे गांधी कुटुंब पाकिस्तानकडून मार्गदर्शन घेत आहे.

- तरुण चुघ, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT