AMit Shah 
देश

Amit Shah : ...तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटं टांगून सरळ करणार; अमित शहा यांची सिंहगर्जना

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूपेश बघेल सरकारविरोधात 'आरोपपत्र' जारी केलं आहे. केवळ भाजपच छत्तीसगडला काँग्रेसच्या लूट, अत्याचार आणि कुशासनापासून वाचवू शकते, असंही शहा यांनी म्हटलं.

भूपेश बघेल यांनी छत्तीसगडला गांधी घराण्याचे 'एटीएम' बनवून राज्याला विकासाच्या वाटेवरून बाजुला नेले. छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना उलटे लटकवून सरळ केले जाईल, असा इशाराही शहा यांनी दिला.

भूपेश बघेल सरकारविरोधात आरोपपत्र जारी करताना अमित शहा म्हणाले की, छत्तीसगडचा विकास व्हावा म्हणून त्याला वेगळे ठेवण्यात आले. मात्र २०१८ मध्ये स्थापन झालेल्या बघेल सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याऐवजी लुटीचे सरकार स्थापन केले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व 11 जागा जिंकू. मात्र केंद्रात मोदी सरकार स्थापन होण्याआधी छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल. मी छत्तीसगडच्या जनतेला वचन देतो की, भाजप सत्तेत आल्यास दोन वर्षांत प्रत्येक घरात शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.

काँग्रेसवर हल्ला चढवत अमित शहा म्हणाले की, मी छत्तीसगडच्या जनतेला सांगतो की, आगामी निवडणूक ही छत्तीसगडला सावरण्यासाठीची निवडणूक आहे. येथे आदिवासींच्या रक्षणाचे आश्वासन दिले होते, पण आज धर्मांतराचे वारे वाहू लागलेत. आता छत्तीसगडची निर्मिती अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. आता केवळ भाजपच राज्याला घोटाळे आणि भ्रष्टाचारापासून वाचवू शकेल, असंही शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT