Andhra Pradesh Crime News 
देश

Crime News: तरुणाला कारमध्ये बांधून जिवंत जाळलं! छोट्या भावाच्या चुकीची शिक्षा मोठ्याला

टोकाचं पाऊल उचलण्यामागं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : तरुणाला कारमध्ये बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. छोट्या भावानं एका विवाहित महिलेसोबत अफेअर असल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळं राज्याला हादरवून सोडलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Andhra man tied burnt alive in car over brother affair with married woman)

जिवंत जाळलेल्या तरुणाचं नाव नागाराजू असून त्याच्या छोट्या भावाचं नाव पुरुषोत्तम असं आहे. तसेच या घटनेतील महिला या सर्वजण आंध्र प्रदेशातील कोन्नासीमा जिल्ह्यातील रामचंद्रपुरम मंडल या गावातील रहिवासी आहेत. संबंधित महिलेच्या कुटुंबियातांना पुरुषोत्तम आणि महिलेचं अफेअर असल्याचं कळालं होतं. त्यानंतर या कुटुंबानं पुरुषोत्तम आणि त्याचा मोठा भाऊ नागाराजू यांना हे प्रकरण सेटल्ड कण्यासाठी आपल्या घरी बोलावून घेतलं होतं.

याचसाठी महिलेचे कुटुंबीय नागाराजूला एका कारमधून निर्जन स्थळी घेऊन गेले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी नागाराजूनला बेदम मारहाण केली आणि त्याला कारमधून दोरखंडानं बांधून ठेवलं. त्यानंतर या कुटुंबातील काही लोकांनी कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. कार पेटवून दिल्यानंतर ती दरीत ढकलून देण्याचा प्रयत्नही या कुटुंबानं केला. पण एका दगडाला धडकून ती कार मध्येच अडकली.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

दरम्यान, कारमध्ये नागाराजूला जळत्या अवस्थेत रस्त्यावरील अनेकांनी पाहिलं. त्यानंतर यातील एकानं पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागाराजूनला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणावर भाजल्यानं त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतांचं पार्थिव पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांकडं सोपवलं. याप्रकरणी पोलिसांनी केस नोंदवून घेतली असून काही गुन्हेगारांना ताब्यात घेतलं. तसेच इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT