Minister KH Muniyappa Karnataka Government esakal
देश

APL, BPL रेशन कार्डांबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट; अन्न-नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, 5 किलो तांदळाचे पैसे..

राज्यभरातील शिधापत्रिकांसाठी (Ration Card) आलेल्या अर्जांचे ३१ मार्चपर्यंत पडताळणी केली जाईल.

सकाळ डिजिटल टीम

मागील सरकारने विधानसभा निवडणुकीपासून २.९५ लाख कार्ड वितरित न करता ठेवले होते.

बंगळूर : राज्यभरातील शिधापत्रिकांसाठी (Ration Card) आलेल्या अर्जांचे ३१ मार्चपर्यंत पडताळणी केली जाईल आणि एक एप्रिलपासून शिधापत्रिका वितरित केल्या जातील, असे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा (K. H. Muniyappa) म्हणाले.

आमदार नयना मोटम्मा आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्र्यांनी उत्तर दिले. आमदार मोटम्मा म्हणाल्या, ‘बीपीएल कार्ड (BPL Card) अर्ज सादर करताना तांत्रिक अडचणी आहेत. अनेकांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नाही. त्यामुळे पाच किलो तांदळाचे पैसे अनेक लाभार्थ्यांपर्यंत अनेक महिन्यांपासून पोचलेले नाहीत.’

विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, ‘राज्य सरकारने बीपीएल शिधापत्रिका देणे बंद केले आहे. तुम्ही म्हणता की, सर्व्हर डाऊन आहे आणि ही समस्या आहे. पाच हमी योजनांसाठी नागरिकांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही बीपीएल कार्ड देत आहात का?

यावर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री मुनियप्पा यांनी उत्तर दिले की, मागील सरकारने विधानसभा निवडणुकीपासून २.९५ लाख कार्ड वितरित न करता ठेवले होते. मात्र आम्ही आतापर्यंत ५७ हजार नवीन कार्ड वितरित केले आहेत. ज्यांनी आरोग्य उपचारासाठी अर्ज केले आहेत, त्यांना तत्काळ कार्ड देण्यात यावे, अशी सूचना केली आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमुळे आम्ही ७४४ लोकांना बीपीएल कार्ड दिले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत सादर केलेल्या अर्जांचा आढावा घेऊन कार्ड दिले जातील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT