Arun Gawli sakal
देश

Arun Gawli : अरुण गवळीच्या अडचणी वाढल्या

खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट आता कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट आता कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे.

गवळीला देण्यात आलेल्या सुटीला आक्षेप घेत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून न्यायालयाने त्यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भुयान यांच्या पीठासमोर याबाबत सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने राजा ठाकरे यांनी युक्तिवाद केला.‘ अरुण गवळीचे वय हे ७१-७२ वर्षे आहे.

आता तो काही ऐंशीच्या दशकातील गवळी राहिलेला नाही जेव्हा त्याच्याबाबत लोकांमध्ये चर्चा व्हायची. तुम्हाला त्याच्या गुन्ह्याची तीव्रता आम्हाला पटवून द्यावी लागेल,’ असे न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितले. गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर तो आमदार होता त्याला ‘मोका’ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT