Lok Sabha Elections 2024 esakal
देश

Lok Sabha Elections 2024 : CM केजरीवाल यांच्या अटकेवरुन INDIA आघाडीची एकजूट; 31 तारखेला महारॅली

Arvind Kejriwa Arrest Updates : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे का होईना आता विरोधकांच्या इंडिया आघाडीची एकजुट झाल्याचं बघायला मिळतंय.

संतोष कानडे

Arvind Kejriwa Arrest Updates : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे का होईना आता विरोधकांच्या इंडिया आघाडीची एकजुट झाल्याचं बघायला मिळतंय.

रविवार, ३१ मार्च २०२४ रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानात महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाचे नेते या रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

दिल्लीमध्ये रविवारी इंडिया आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाही करत आहेत. त्यामुळे ३१ तारखेला सकाळी १० वाजता रामलीला मैदानात महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

गोपाल राय पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप लावले जात आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यालयाला पोलिस छावणीचं स्वरुप दिलं गेलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक दिली जात आहे. काँग्रेस पक्षाचं अकाऊंट सील केलं आहे, त्यामुळे प्रचारात अडथळा येत आहे. हे लोक दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करु शकतात, तर काहीही करु शकतात.

पत्रकार परिषदेत दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंह लवली यांनी सांगितलं की, विरोधी पक्षांना समान संधी दिली जात नाही. काँग्रेसच्या खात्यावर बंधनं आणली आहेत, मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी महारॅली आयोजित केली आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, शनिवारी अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जस्टिस मनमोहन यांच्या कोर्टाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला. ईडीच्या रिमांड विरोधात त्यांनी शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी तातडीची सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT